महाराष्ट्रमुंबईराजकारण

शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये मंत्रिपद देण्याच्या नावाखाली आमदाराकडे केली १०० कोटींची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये मंत्रिपद देण्याच्या नावाखाली आमदाराकडे केली १०० कोटींची मागणी

कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या नावाखाली एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडे १०० कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

राज्यात  नवे सरकार स्थापन झाले असून, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मंत्रिपदासाठी  इच्छुक आमदार सध्या नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चारही आरोपींनी आमदाराला गाठून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

आरोपींनी आमदारांना  विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत, मंत्री महोदयांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले.

त्यानंतर दोन-तीन वेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून, मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यासाठी १०० कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर १७ जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली.

मंत्रिमंडळात सहभागासाठी ९० कोटी रुपये मागत असून, त्यातील २० टक्के रक्कम म्हणजे १८ कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे आमदारांना सांगितले.

आरोपीने सोमवारी नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले.

याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपींची नावे समोर आली.

एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय ५३, नागपाडा, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

litsbros

Comment here