गृहखात्याने पोलीस भरतीचा ‘तो’ निर्णय बदलला; मराठा विद्यार्थ्यांना दिलासा
४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून अर्ज भरण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. अखेर तो निर्णय रद्द करण्यात आल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
४ जानेवारीचा निर्णय नेमका काय होता ?
एसईबीसीचे आरक्षण न ठेवता पोलीस भरती प्रक्रिया पार पाडा. एसईबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू होणार आहे.
जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळणार आहे. एसईबीसीतून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाईन भरुन 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण होणार आहे.
पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा, हा काढलेला शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
विद्यार्थ्यांना ‘एसईबीसीचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग शुद्धीपत्रक काढणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
Comment here