ताज्या घडामोडीपंढरपूर

आजपासून दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन; ‘असे’ करा बुकिंग

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आजपासून दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन; ‘असे’ करा बुकिंग

पंढरपूर (१७ नोव्हेंबर) – पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने आजपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. मात्र दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदीची कर्मचार्‍यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.

मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छते बरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणार्‍या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणार्‍या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना दर्शनाकरीता सोडण्यात येत आहे.
ऑनलाईन बुकींग केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने http://www.vitthalrukminimandir.org/home.html
या संकेत स्थळावर बुकिंग भाविकांनी करावे, असे आवाहनहीं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

हेही वाचा – वाशिंबे परिसरात आयडीया व जिओ टाँवर ठरत आहेत कुचकामी; विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान

३२ लाख ६७ हजार ९८६ रु.अपहार केल्या प्रकरणी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागलांसह कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल

भाविकांसाठी नियमावली

👉 सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना मुख दर्शन घेता येणार

👉 प्रति तास 200 भाविकांना दर्शनाकरीता सोडणार

👉 ऑनलाईन दर्शन बुकींग करावे लागणार

👉 भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे,
बुकींग 8 दिवसापर्यंत करता येणार

👉 मुख दर्शनाकरीता कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार

👉 कोरोनाची लक्षणे आढळणार्‍यांना दर्शन प्रवेश बंद

👉 मंदिराच्या पुर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील.

👉 दर्शन रांगेत फिजीकल डिस्टन्स (दोन भाविकात 6 फुट अंतर) ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आले आहे.

👉 अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहिल

👉 सध्या 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे.

 

litsbros

Comment here