ताज्या घडामोडीपंढरपूरसोलापूर जिल्हा

विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी करावे लागणार ऑनलाईन बुकींग;पंढरपूर मंदिरात दररोज १ हजार भाविकांना प्रवेश

विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी करावे लागणार ऑनलाईन बुकींग;पंढरपूर मंदिरात दररोज १ हजार भाविकांना प्रवेश

पंढरपूर :आज पाडव्यापासून राज्यातील मंदिरं उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या दिवाळी गिफ्टमुळे भक्तांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. पण मंदिरं खुली करताना प्रत्येक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. याचं सरकारच्या गाडलाइन्स लक्षात घेत पंढरपूर मंदिरही आता भाविकांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये उत्साह पसरला आहे.

 मंदिर समितीच्या  मिळालेल्या माहितीनुसार, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे
या‍मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ६५ वर्षावरील आणि १० वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा – मृतदेह घेऊन चाललेल्या अँब्युलंसचा अपघात; 3 जण जागीच ठार, 10 जण जखमी; सोलापूर जिल्ह्यातील भीषण अपघात

राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त वाशिंबे जि.प. शाळेला पाच वर्षांपासून मिळेना मुख्याध्यापक; शिक्षण विभागाचा अजब कारभार

नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.यामध्ये भाविकांना श्री विठ्ठलाचे फक्त मुख दर्शन मिळणार आहे. शासनाच्या मार्गदर्शना नुसारच दर्शन देणार असल्याची भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली आहे.

litsbros

Comment here