पंढरपूरमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

पंढरपूर:यावर्षीचा शासकीय महापूजेचा मान मिळणार ‘ या ‘ दांपत्याला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पंढरपूर:यावर्षीचा शासकीय महापूजेचा मान मिळणार ‘ या ‘ दांपत्याला

पंढरपूर:गुरूवारी कार्तिकी यात्रा आहे. या दिवशी विठ्ठलाची शासकीय पूजा केली जाते.वास्तविक पहाता शासकीय पूजाचा मान हा दर्शन रांगेतून निवडला जातो.परंतू यंदा कोरोनाचे सावट असल्याने पंढरपूरात संचार बदी  आहे.दरवर्षी प्रमाणे यंदा कार्तिक शुध्द एकादशी या दिवशी भरणारी कार्तिकी यात्रा यावर्षी गुरूवार, दिनांक २६ नोव्हेंबर,२०२० रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेची शासकीय महापुजा संपन्न होणार आहे.

उपमुख्यमंत्री यांच्या सोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचे वारकरी म्हणून श्रीविठ्ठल मंदिरात गेल्या ९ ते १० वर्षापासून विणेकरी म्हणून पहारा देणारे विणेकरी कवडूजी नारायण भोयर व त्यांच्या सुविज्ञ पत्नी यांना यावर्षी महापूजेचा मान मिळणार आहे.

हेही वाचा – माढा तालुक्यातील पहिले MBBS डॉक्टर करंदीकर..व तालुक्याची वैद्यकीय वाटचाल; वाचा कुर्डुवाडीचा इतिहास भाग- २

बापरे! पाटील यांच्या कारखान्यात वायू गळती; दोन कामगारांचा मृत्यू तर 8 पेक्षा जास्त जखमी

 यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. दि.२५ नोव्हेंबर ते दि.२७ नोव्हेंबर या कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे
विणेकरी यांची उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने घेतला आहे.

litsbros

Comment here