क्राइमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर

२०१३ साली घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

आरोपी विक्रम भावे- २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर मॉर्निंग वॉक घेत असताना पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक केली होती. भावेला या दोघांना मदत केल्याचा ठपका ठेऊन २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती.

भावेला द्यावी लागणार हजेरी –

विभागीय खंडपीठाने सांगितलं की भावेला न्यायालयाच्या परिक्षेत्राबाहेर जाता येणार नाही.
त्याला आठवडाभर रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागेल.

त्याचसोबत पुढचे दोन महिने त्याला आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागणार आहे.
त्यानंतर ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला दर आठवड्याला हजेरी द्यावी लागणार आहे.

दरम्यान, भावे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवासात आहे. एक लाख रुपये भरल्यानंतर त्याची सुटका होणार आहे.

हेही वाचा-हृदयद्रावक घटना, एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडले प्राण

कोरोनाच्या धास्तीने करमाळा तालुक्यातील ‘गावांचं गावपण हरवले’ अनेक कुटुंबांनी शेतातच थाटला संसार; गावे होऊ लागली रिकामी

त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. जामीनाच्या आदेशावर स्थगिती मिळावी ही सीबीआयची मागणी कोर्टाने नाकारली.

litsbros

Comment here