करमाळाराजकारण

“अन्यथा रस्त्यावर उतरू..” ‘या’ मागणीसाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा इशारा

करमाळा तालुक्यात तुर, उडिद, मका,मूग हमीभाव केंद्र सुरू करा- माजी आमदार नारायण पाटील

जेऊर (प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यात जुन महीन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामात तूर, उडीद, मका , मूग या पिकांची मोठ्याप्रमाणावर पेरणी केली आहे. त्यामुळे यावर्षी तुर, उडीदाचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होणार आहे.शेतक-यांच्या तुरी, उडीद, मूग, मकेला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने करमाळा तालुक्यात तुरी , उडीद, मूग व मका खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू करावीत अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.

जर वेळेत हमीभाव केंद्र सुरू झाली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.
हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंञी उध्दव ठाकरे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंञी दादा भुसे,पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे.


याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा विधानसभा मतदारसंघात शेतकर्‍यांनी हजारो हेक्टरमध्ये तूर, उडीद, मूग या खरीप पिकांची लागवड केलेली आहे. तूर पिकाचा हमीभाव शासन दफ्तरी रक्कम रुपये ५८०० आहे. माञ व्यापारी शेतकर्‍यांची तुर 4 हजाराच्या पुढे खरेदी करत नाहीत त्यामुळे शेतक-यांना मोठा रूपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

यावर्षी करमाळा तालुक्यात तूर – 14388 हेक्टर,उडीद- 13819 हेक्टर,मूग – 2819 हेक्टर,मका – 7207 हेक्टर ऐवढ्या क्षेञावर पेरणी झाली आहे.करमाळा तालुक्यात पहील्या 13 हजार 819 ऐवढ्या मोठ्या प्रमाणात उडदाची पेरणी झाली आहे.शिवाय वेळेवर पाऊसही झाला आहे.गेल्यावर्षी कोणत्याही हमीभाव केंद्र सुरू केले नाही.परीणामी शेतक-यांचे नुकसान झाले.यावर्षी वेळेत हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी वेळेत व्हावी यासाठी बाजारात तुर, उडीद, मका विक्रीसाठी येण्यास वेळ आहे, त्यापूर्वीच आपण मागणी करत आहोत. करमाळा तालुक्यात हमीभाव केंद्र सुरू झाली नाहीत तर, वेळेप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू.

– माजी आमदार नारायण पाटील, करमाळा

प्रत्येक वर्षी शेतमालाबाबत हमीभाव जाहीर करायचा पण त्या भावाने माल खरेदी करण्याबाबत दिरंगाई केली जाते .ही दिरंगाई व्यापार्‍यांच्या पथ्यावर पडत आहे. गतवर्षी हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने तूर, उडीद,हरभरा ,मका, मूग या पिकांवर शेतकर्‍यांनी केलेला उत्पादन खर्चही निघालेला नाही. गेल्यावर्षी शेतकर्‍यांची तूर व्यापार्‍यांनी ४ हजार ते ४ हजार ४०० रुपये एवढ्या मातीमोल कमी दराने खरेदी केली होती.

त्यामुळे शेतकर्‍यांचा तूर पिकांसाठी लागवड पूर्व जमिनीची मशागत, बियाणे, खते, किटकनाशक फवारणी, मळणी आदीवर होणारा खर्च उत्पादीत मालाच्या विक्रीतून येणार्‍या पट्टीपेक्षाही जास्त होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये कमालीची नाराजी व अस्वस्थता आहे. त्यामुळे शासनाने खरीप तूर, उडीद, मूग,मका पिकांच्या मालासाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

 

litsbros

Comment here