करमाळाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई टी.व्ही. जर्नलिस्ट एसोसिएशनच्या निवडणुकीत करमाळयाचे विनोद जगदाळे दुसऱ्यांदा बहुमताने विजयी !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मुंबई टी.व्ही. जर्नलिस्ट एसोसिएशनच्या निवडणुकीत करमाळयाचे विनोद जगदाळे दुसऱ्यांदा बहुमताने विजयी !

भारतातील एकमेव टी व्ही पत्रकारांची एकमेव संघटना असलेल्या टी व्ही जर्नलिस्ट एसोसिएशनच्या निवडणुकीत, न्यूज़ 24 वृत्तवाहिनेचे मुंबई ब्यूरो चीफ विनोद जगदाळे बहुमताने विजयी झाले. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी नेटवर्क 18 ग्रुपचे विडिओ जर्नलिस्ट नितिन सोनावणे यांचा 46 मंतानी पराभव केला,विनोद
जगदाळे यांना 129 मते तर नितिन सोनवणे यांना 83 मते मिळाली.

इतर पदा साठी झालेल्या निवडणूकीत जगदाळे समर्थित उमेदवार विजयी झाले,ज्यामधे टी व्ही 9 चे कल्पेश हडकर उपाद्यक्ष पदी, न्यूज़ नेशन वृत्तवाहिनेचे राजेश माळकर सचिव पदी,ज़ी मीडियाचे राजीव रंजन खजिनदार पदी तर सहसचिव पदी टि व्ही 9 चे अक्षय कुडकेलवार बिनविरोध निवडून आले.

कार्यकारणी पदी झालेल्या निवडणूकीतही विनोद जगदाळे समर्थित 8 पैकी 6 उमेदवार विजयी झाले ज्यामधे रिपब्लिक चे समीर शेळके, Times ग्रुपचे सुरेश साहिल,एबीपी माझाचे अजित शिवतरकर
ए एन आय एजेंसी चे संदीप पाटिल,साम टीवी चे राजू सोनावणे,नेटवर्क 18 सर्वेश तिवारी विजयी झाले तसेच आजतक चे राजू रेवणकर,इंडिया टि वी चे संतोष पानवलकर यांनी विजय संपादित केला तसेच
एबीपी माझा च्या मनश्री पाठक व न्यूज़ एक्सच्या उर्वशी खोना या दोघी बिनविरोध निवडून आल्या.

हेही वाचा – करमाळा माढा न्यूजचे प्रतिनिधी राहुल धोका यांची रेल्वे सल्लागार समितीवर निवड

महावितरणच्या गलथान कारभारमुळे पोंधवडी येथील शेतकऱ्याचा एकर उस जळुन खाक! नुकसान भरपाईची मागणी

विनोद जगदाळे यांनी कोविड 19 च्या महामारी मधे बीएमसी च्या सहकार्याने भारतातील पहिला कोविड 19 टेस्ट कैम्पचे यशस्वी रित्या आयोजन केले ज्यामधे 53 पत्रकार पॉजिटिव सापडले होते,या पॉजिटिव पत्रकारांची क्वारंटाइन व हॉस्पिटलची व्यवस्था ही केली होती,
सोबतच मागील 2 वर्षा मधे विनोद जगदाळे व त्यांच्या कार्यकारणी ने विविध उपक्रम हाती घेऊन टिविजेए सदस्यांच्या विकासासाठी काम केले होते.

litsbros

Comment here