करमाळासोलापूर जिल्हा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३०,९९६ अर्जमंजूर : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३०,९९६ अर्ज मंजूर : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा(प्रतिनिधी) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यातून आजअखेर आलेल्या ३४,३६२ अर्जापैकी ३०,९९६ अर्ज मंजूर झालेले असून या बहिणींना राखीपोर्णिमेनिमित्त दि.१९ ऑगस्ट रोजी पहिल्या दोन महिन्यांचे म्हणजेच प्रत्येकी ३,००० रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

तर २,४१६ अर्ज फेर सादर करण्यात आलेले आहेत तसेच सर्व अर्जाना मंजुरी देणारा करमाळा हा राज्यातील पहिलाच तालुका ठरला असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी दिली.या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत असल्याने जास्तीजास्त बहिणींनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा – वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

करमाळा येथे स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न; क्लिक करून वाचा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे

ही योजना प्रभावीपणे राबविण्याकामी प्रयत्न करणाऱ्या या योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या सदस्य-सचिव तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे,पं.स.गटविकासाधिकारी मनोज राऊत,संबंधित सर्व अधिकारी,कर्मचारी,सर्व ग्रामपंचायतींचे ऑपरेटर्स, अंगणवाडी सेविका,कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे.

 

litsbros