महाराष्ट्रशैक्षणिक

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाविरुद्ध कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अपील दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाविरुद्ध कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अपील दाखल

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्षांकडे अपील दाखल करण्यात आले आहे .याविषयी सविस्तरपणे बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की,अवर सचिव वळवी, उपसचिव हंजे व कावरे या ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली .

न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती शिक्षक महासंघास ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली . त्याबद्दल संघटनेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले .34 गावातील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न,जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील 2012 पासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती व प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली .

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांची भेट घेऊन मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली .नैमित्तिक रजा देताना राज्य सरकारने केलेल्या भेदभावाविरुद्ध आयोगाकडे अपील दाखल करण्यात आले .15 दिवसांत महाराष्ट्र शासनाकडून या विषयाची सर्व माहिती घेऊन पुढील सुनावणी ठेवण्यात येईल असे आश्वासन अध्यक्ष यांनी दिले .

सुरेश माने (वकील मुंबई हायकोर्ट) यांची भेट घेऊन शिक्षक प्रश्नांवर न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन घेण्यात आले .सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचे कार्य-निष्पादन अधिकारी यांची भेट घेऊन राज्यातील मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत व तेथे कार्यरत असणार्‍या शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .

येत्या पंधरा दिवसात याबाबतचे आदेश सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले .राज्यपाल भवनचे संपर्क अधिकारी यांची भेट घेऊन राज्य सरकार शिक्षक संघटनाबाबत करत असलेल्या भेदभावाची माहिती देण्यात आली . चौकशी करून योग्य ती करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांची भेट घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात आकाशवाणी आमदार निवास येथे चर्चा केली .या सर्व प्रश्नांची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना देण्याचे तसेच या प्रश्नांवर तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे अश्वासन त्यांनी कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले .

हेही वाचा – वृक्ष संवर्धनासाठी युवकाचे भारत देशात भ्रमण;काश्मीर ते कन्याकुमारी पायी दिंडी : करमाळ्यात स्वागत

यशोगाथा- गरिबीवर मात करत माढा तालुक्यातील ढवळस गावच्या लेकीची पी.एस.आय(PSI) पदाला गवसणी

यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे , राज्यकार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण ,खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंणगारे,सोमनाथ पोळ,श्रीकांत पालवे सर ,प्रशांत आंधळे सर हे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .

litsbros

Comment here