माढाराजकारण

उपळवटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘यांची’ निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपळवटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘यांची’ निवड

उपळवटे (प्रतिनिधी);
माढा तालुक्यातील उपळवटे ग्रामपंचायत चे नुतन सरपंच राहुल घाडगे यांची निवड करण्यात आली. त्यांचे चुलते कै.युवराज भिमराव घाडगे यांनी सलग पंधरा वर्षे बिनविरोध ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला होता.

त्यानंतर आज राहुल घाडगे यांच्या हाती ग्रामपंचायतीची सत्ता आली आहे उपळवटे गावचे माजी सरपंच बालाजी गरड पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल कृष्णात घाडगे यांच्या कडे उपळवटे ग्रामपंचायतीची सत्ता आली असल्याची माहिती विनोद कृष्णात घाडगे यांनी दिली आहे.

उपळवटे गावातील नागरिकांनी मला निवडुन दिल्यामुळे सरपंच पदाचा मान मिळाला आहे उपळवटे गावातील नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहिल असे उपळवटे गावचे सरपंच राहुल घाडगे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विठ्ठलराव शिंदे सह साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा खुपसे पाटिल विठ्ठल कार्पोरेशन लि म्हैसगाव चे संचालक उध्दव दादा माळी कुमार भैय्या घाडगे मातोश्री दुध डेअरी चे चेअरमन भरत नाना खुपसे पाटिल शिक्षणप्रेमी अशोक गरड पाटील महाविर खुपसे पाटिल माजी सरपंच बालाजी गरड पाटील,

युवा नेते ग्रा.पं सदस्य विशाल खुपसे पाटिल दिलीप खुपसे पाटिल महेश गोसावी दिपीका देवडकर रब्बाना मुलाणी सुदामती शेळके तानाजी गायकवाड संगणक परिचालक अंगद शेळके ग्रामसेवक बनाते भाऊसाहेब सोलापूर जिल्हा मातंग समाजाचे अध्यक्ष अधिकराव भिसे राहुल घाडगे भाऊसाहेब यादव दत्ताआप्पा घाडगे जगदीश देवडकर तेजस घाडगे नितीन काळे प्रशांत खुपसे पप्पू सपाटे आदि मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here