आरोग्यमाढामाणुसकीसोलापूर जिल्हा

माढा तालुक्यातील अंजनगाव (खे) येथे युवकांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन

माढा तालुक्यातील अंजनगाव(खे) येथे युवकांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन

माढा (प्रतिनिधि) :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुडवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. हाच हेतू लक्षात घेऊन माढा तालुक्यातील अंजनगाव खे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हे रक्तदान शिबिर युवा ग्रुप च्या वतीने भरवण्यात आले. या शिबिराला गावातील युवकांनी रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावला. या शिबिरामध्ये एकूण १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास पाण्याचे जार भेट म्हणून देण्यात आले.

गावातील अनेक कार्यक्रमांमध्ये युवा ग्रुपचे मोलाचे कार्य असते. ज्या युवकांनी या शिबिरात रक्तदान केले त्यांचे युवा ग्रुप च्या वतीने आभार मानण्यात आले.

करमाळयातील सौ.दिपाली कोष्टी यांनी साकारला आदर्श व वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव; मुख्याधिकारी वीणा पवार यांनी दिली भेट

 

 

कोरोना देवीची स्थापना करून अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

पत्रकार जयंत दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांना अन्नदान वाटप

litsbros

Comment here