राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा लढविणार; जिल्हाध्यक्षांनी केली घोषणा

राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा लढविणार; जिल्हाध्यक्षांनी केली घोषणा 

माढा (प्रतिनिधी) : “वन बुथ टैंन युथ” आणि मिशन माढा लोकसभेसाठी पुढील रणनीती आखण्यासाठी करमाळा शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.

या बैठकीस प्रमुख अध्यक्ष म्हणून अनुसूचित जाती जमाती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश लोंढे होते. 

यावेळी जिल्हा अध्यक्ष रणंजित सुळ म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभेसह सर्व विधासभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. 

त्या अनुषंगाने रविवार रोजी नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड,नातेपुते येथे वार-रविवार, दिनांक ८/१०/२०२३ रोजी, राष्ट्रनायक माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अँड संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मिशन माढा लोकसभा आणि वन बुथ टैंन युथ आणि जिल्हा परिषद गट,गण प्रमुख प्रभारींची कार्यशाळा नातेपुते येथे घेण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रणजित सुळ यांनी म्हटले आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पूजारी, युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी, संपर्क प्रमुख गोरख वाकडे, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, लोकसभा अध्यक्ष भैरू सलगर, जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील, शंकर सुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश लोंढे म्हणाले की,रासप पक्षात सर्व वंचित,कष्टकरी घटकातील जाती धर्माला न्याय देण्याचे काम राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब करत आहेत. 

येणार काळ राष्ट्रीय समाज पक्षासाठी अतिशय चांगला आसेल त्यामुळे कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करून गाव तिथे शाखा बुथ तिथे कार्यकर्ता जोडावा.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, तालुकाध्यक्ष जीवन होगले, युवा तालुका अध्यक्ष कृष्णा कोंडलकर, ता.प्रभारी नामदेव पालवे, कार्याध्यक्ष शिवाजी नलावडे, चंद्रशेखर पाटील, शंकर सुळ, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे, पदवीधर अध्यक्ष संभाजी पालवे, सुहास ओहळ, प्रवीण मखरे, अल्प सं.अध्यक्ष जहाॅंगीर पठाण, 

महिला अध्यक्ष शारदा सुतार,जगन्नाथ सलगर,विठ्ठल खांडेकर,अश्यपाक शेख, कल्याण खटके, गोवर्धन शिंदे, गणेश हाके इत्यादी रासप पदाधिकारी उपस्थितीत होते.

प्रस्तावित अंगद देवकते यांनी केले तर आभार चंद्रशेखर पाटील यांनी मांडले.

karmalamadhanews24: