माढा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी

माढा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा

मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी 

माढा प्रतिनिधी – मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ माढा तहसील कार्यालयावर मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. माढा येथील जगदाळे मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शाळकरी मुलींच्या हस्ते करून मोर्चाची शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव,महिला व इतर समाजाचे लोकही उपस्थित होते.माढा ते वैराग या राज्य मार्गावरून मोर्चा तहसील कार्यालयाकडे जात असताना सकल मराठा समाजाच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या.तहसिल कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना व माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमराय खणदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळकरी मुलींच्या हस्ते मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा – अभिनंदनीय; अखेर करमाळा तालुक्यातील ‘ही’ ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या प्रयत्नतून बिनविरोध; सर्वांनी आदर्श घेण्याची गरज!

बँकींग क्षेत्रातील बदलते ज्ञान व माहितीच्या देवाणघेवाणीसाठी प्रशिक्षण आवश्यक – चेअरमन अशोक लुणावत नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे ते आम्ही घेणारच, मनोज जरांगे-पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,निष्क्रिय व वेळकाढूपणा करणा-या शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.याप्रसंगी माढा तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते,सामाजिक,शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मान्यवर व सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

karmalamadhanews24: