बारलोणीतील पोलिसांवर दगडफेक प्रकरणातील एकजण तेलंगणा गुन्ह्यातील आरोपी; दोघांना अटक
तेलंगणा गुन्हयातील एकाचा यात समावेश
कुर्डुवाडी (राहुल धोका):बारलोणीतील पोलिसांवर दगडफेक करणारया आणखीन दोन आरोपी ना पकडण्यात पोलिसाना यश आले होते. सांगोला येथे सुवर्णकारास लुबाडण्यारया आरोपीस पकडण्यासाठी सोलापुर चे गुन्हे शाखेकडील पथक बारलोणी (ता.माढा) येथे गेले असता पथकावर सदर आरोपी ने त्याच्या सहकार्या सह काठी व दगडफेक करून तीन पोलीसना जखमी केले होते.सदर घटनेबाबत कुर्डुवाडी पोलिसांत हल्ला करणाऱ्या अकरा आरोपीं व इतर पन्नास अज्ञात व्यक्ति वर गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्यातील राहुल गुंजाळ,यशवंत गुंजाळ , अनिल गुंजाळ या तीन आरोपीना या पुर्वीच कुर्डूवाडी पोलीसनी अटक केली होती. अन्य आरोपींच्या शोधात सोलापुर गुन्हे शाखेचे पथक,स्थानिक पोलिस प्रयत्न करत होते मंगळवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान बारलोणी गावात काही आरोपी फिरत असल्याची माहिती पोलिस खबरया कडुन मिळाली.
त्या नुसार सदरच्या ठिकाणची सोलापुर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील इतर अधिकारी व कर्मचारी, मुख्यालयाकडील आरसीपी पथक यांच्या संयुक्तरित्या बारलोणी गावात जाऊन सदर गुन्हयातील संतोष गुंजाळ, सुभाष गुंजाळ रा.बारलोणी यांना ताब्यात घेतले आहे .
लॉकडाऊन मध्ये उतरती कळा आलेल्या हॉटेल, ढाब्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमुळे मिळाली नवसंजीवनी
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस आधिक्षक अतुल झेंडे यांच्या सह सोलापुर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील,सपोनि रवींद्र मांजरे,सपोनि श्याम बुवा, सोलापुर स् गुन्हे शाखेचे कर्मचारी व पोलीस मुख्यालया कडील आरसीपी पोलीस पथकाने केली आहे.सापडलेल्या दोन आरोपींना माढा न्यायालया ने चार दिवसाची दि १६ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
Comment here