आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराज्य

बिग ब्रेकिंग- उद्या 22 एप्रिल पासून महाराष्ट्रात आणखी कडक निर्बंध; ‘हे’ नियम मोडाल तर 50 हजार दंड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बिग ब्रेकिंग- उद्या 22 एप्रिल पासून महाराष्ट्रात आणखी कडक निर्बंध; ‘हे’ नियम मोडाल तर 50 हजार दंड

मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध जाहीर केलेत. ‘ब्रेक द चेन’च्या निर्बंधांच्या आदेशानुसार 22 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. यानुसार आता सार्वजनिक वाहतुकीसोबतच खासगी वाहतुकीवरही मर्यादा येणार आहेत. सरकारने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादीत केलाय. यात काही परिस्थितीत अपवादात्मक सुटही देण्यात आलीय. मात्र, अशावेळी प्रवाशांच्या संख्येबाबत कठोर आणि स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. या नुसार, अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. पण, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येतील. तर, सर्व सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार.

तसेच, लग्नात 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळ मर्यादा दिलेली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.

सदर नियमांमध्ये जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला असून, खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे.

प्रवासी वाहतुकीबाबत नियम काय?

1. खासगी बसेस किंवा वाहतूक व्यवस्था केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येणार. त्यातही चालकासह एकूण जागांच्या 50 टक्के माणसांची वाहतूक करता येणार. ही वाहतूक केवळ शहरात किंवा जिल्ह्यांतर्गतच होईल. असा प्रवास इतरांसाठी केवळ अंत्यविधी किंवा कुटुंबातील आजारपण या अपवादात्मक स्थितीतच करता येईल. नियमांचं उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंड होणार आहे.
2. खासगी बसेसला एकूण आसन व्यवस्थेच्या केवळ 50 टक्के प्रवासी वाहतूक करता येणार आहे. उभ्या प्रवाशांवर पूर्ण बंदी असणार आहे.

3. या काळात असा प्रवास करणाऱ्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन त्यांना 14 दिवसांच्या गृह विलगीकरणात राहणं बंधनकारक असेल.
4.. प्रत्येक प्रवाशाचं तापमान मोजलं जाणार आहे. ज्याला कोरोनाची लक्षणं दिसतील त्यांना तातडीने कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल.

5. प्रवासा दरम्यान तपासणी अधिकाऱ्यांना एखाद्या प्रवाशावर संशय आल्यास ते संबंधित प्रवाशाला सक्तीची कोरोना चाचणी करण्याचे आदेशही देऊ शकतात. त्याचा खर्च प्रवासी किंवा बस मालकाकडून घेतला जाणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत नियम काय?

मुंबईत केवळ सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनाच लोकल रेल्वेतून प्रवासाची परवानगी असणार आहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील.
राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?

1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.

2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.

3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.

litsbros

Comment here