🌹🌹🌹 हॉटेलमधला पहिला सत्कार 🌹🌹🌹
( मेनू कार्ड )
************************
……… तोंडाला पाणी सोडणारा लेख ……..
🌹🌹🌹
आज आपण एका जवळच्या विषयाला हात घालणार आहोत हे बघा काही कारणास्तव आपण हॉटेलमध्ये नाश्ता किंवा जेवण करायला गेलो असता हॉटेलची पायरी चढतानाच विचारांची कालवा कालवा सुरू होते ती म्हणजे काय घ्यायचं अन काय खायचं कारण जी आहे ती रोजचं आपलं तेच आहे मग नवीन कुठून आणायचं प्रत्येक जणाला आपापल्या घरी ही सगळं मिळतंय पण इथल्या सारखी चव घरी येत नाही फिल तसा वाटत नाही
आणि आत गेल्यावर एव्हाना टेबलाजवळ जाताच इतर ठिकाणी सत्कार होतो तो पुष्पगुच्छ देऊन तर इथं सत्कार होतो तो अगदी नम्रपणे व्याह्याला लग्न पत्रिका द्यावी इतक्या मानापानाप्रमाणे दोन्ही हातात धरून अलगद आपल्या हवाली एक कार्ड केलं जातं ती म्हणजे मेनू कार्ड तसं बघायला गेलं तर हॉटेल कसंही असो मेनू कार्ड मात्र सजवलेलं असतं मुखपृष्ठावर हॉटेलला साजेसं चित्र असतं म्हणजे हॉटेलचं नाव आमंत्रण…निमंत्रण… सत्कार… पाहुणचार…असं जर असलं तर दोन कमनीय बांध्याच्या अप्सरा हातामध्ये फुलांच्या माळा घेऊन वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत उभ्या असतात कार्डच्या आत मध्ये एवढे पदार्थ सामावून सुद्धा त्या कधी जाड झाल्याचं पाहण्यात किंवा ऐकिवात नाही हे एक नवलच हॉटेलचं नाव मिर्च मसाला असं झणझणीत अर्थाचं असलं तर हळद… धने… जिऱ्याची पूड…तिखट… मीठ…मसाला…मिरच्या… अशा प्रत्येकाची एक एक वाटी असलेलं सुंदर ताट चित्रामध्ये दाखवतात पण प्रत्यक्षात पदार्थ तयार करताना आपले तयार मसालेच
वापरले जातात तरीही आमचे हे मसाले आम्ही स्वतः घरीच बनवलेले मसाले वापरतो हा दावा करायलाच पाहिजे मेनू कार्ड बनवण्यासाठी अतिशय जाड पुठ्ठा वापरायला कोणी व कधी सुरुवात केली याचा पत्ता लागत नाही काही तरी भारदस्त वाचल्याचं समाधान कस्टमरला मिळावं एवढाच कदाचित हेतू असावा
गिर्हाईकाने या हॉटेलमध्ये या हॉटेल सारखं मानून इथे जरा जपून वागाव या हेतूने मेनू कार्डवर बराच खर्च केलेला असतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन याप्रमाणे मेनू कार्ड अतिशय सुबक तपशीलवार रचलेले असतात एखादं खंड काव्य हातात धरावे तसे ते अलगद धरावं लागतं फरक एवढाच खंड काव्य तिसऱ्या पानापर्यंत वाचलं जात नाही म्हणजे वाचवत नाही पण मेनू कार्ड अनेकदा पूर्ण वाचलं जातं किंवा चाळलं तरी जातं कारण हे कार्ड म्हणजे आयुष्यातील इंटरेस्टिंग निर्जीव वस्तू आहे कारण याच्या जाडीचं आणि हॉटेलचा दर्जा याचं प्रमाण व्यस्त असावं भूक लागल्यावर खायला मिळेल अशी जागा मिळणे ती स्वच्छ आणि विश्वासार्ह असणे आणि जे मागवलं ते लवकर समोर येणं या पलीकडे खरंतर हॉटेलवाल्याकडून बहुतेकांच्या हल्ली अपेक्षा असतात पण अगोदर मेनू कार्ड नम्रपणे…बेदरकार पणे…किंवा तुच्छ पणे… सरकवलं जातं नम्रपणे सरकवलं तर खिशाला चाट पडणार हे नक्की…बेदरकारपणे आपटले गेल्यास हे वाचून काय करणार जे इथं आहे तेच घ्यावं लागणार… आणि त्यात एखाद्याची ही वृत्ती असते तुच्छ पणे मेनू कार्ड समोर फेकण्यास मोठे मेनू कार्ड वाचतायेत 40 रु. च्या वर बिल जाणार नाही यांची ही भावना असते म्हणजे थोडक्यात आपल्या खिशाची ही लोकं चेष्टा करतात
कुछ थंडी शुरुवात अशी सुरुवात करून ग्राहकाला खुश केलं जातं ऐकून हुडहुडी भरल हे नक्की जेवायला जाणारे थंडीच सुरुवात करतात हे कशावरून गृहीत धरलं जातं याचा कोणताही आजवर पत्ता लागलेला नाही या गार आरंभामध्ये ताक…सोलकढी… कोकम सरबत… रूह अफझा… लिंबू सरबत…जलजिरा… साधं पाणी…यांचा समावेश होतो ताकामध्ये पुन्हा प्रकार असतात मसाला ताक…प्लेन ताक…नुसतं मीठ घातलेलं ताक…वगैरे पाच एक रुपये इकडे तिकडे होतात काही गिऱ्हाईक तर मेनू कार्ड मध्ये दाखवलेला जेवणाचा मार्ग बरहुकूम मानून चालताना दिसतात मेनू कार्डमध्ये पुढे आलेले स्टार्टर्स व त्याचे दर पाहून एन्डर्स वाटू लागतात स्टार्टर म्हणजे स्टार्ट करताना काय घ्यायचं कारण मागवलेला पदार्थ समोर यायला थोडासा वेळ असतो तोपर्यंत काहीतरी थोडसं स्टार्टर मध्ये काय खायचं इथपासून स्टार्टरमध्येच पोट भरतं इथपर्यंतचा प्रवास मराठी मनाने यशस्वी केलेला आहे आणि हे जे स्टार्टर आहेत त्यांचं जेवणामध्ये स्थान कशावरून ठरलं हे काही केल्या समजत नाहीत
मसाला पापड हा पदार्थ 80 च्या दशकामध्ये झळकला आणि रुळला पण स्टार्टर म्हणून एखादा पदार्थ मान्य होईल ही पण चिकन अंगारा… शोले पनीर… अमृतसरी बास्केट… असले पदार्थ खायच्या आधी खरंच विचार करून डोकं खराब करतात आता अमृतसरी शब्द जरी असला तरी अमृतसर मध्ये कोणीच ही असलं कायं खात नाही ही मात्र नक्की असतं असाच स्प्रिंग रोल नावाचा पदार्थ रुळलेला आहे वास्तविक चार स्प्रिंग रोल खाल्ल्यानंतर सरळ हाफ राइस दाल मारके खाल्ला तरी पुरू शकतो पण या मेनू कार्डने स्टार्टर म्हणून लिहिलेल्या पदार्था नंतरच्या मेन कोर्स कडे ढुंकून पण न बघणे हा आपण केलेला आपलाच अपमान समजतो अशी भावना गिऱ्हाईकाला मेन कोर्स ऑर्डर करण्यास भाग पाडत असाव्यात त्या कार्डवर लिहिलेलं असतं चीज चेरी पायनॅपल हे कॉम्बिनेशन शोधून काढणारा माणूस कचऱ्यामधून कला निर्मिती असं काहीतरी कोर्स चालवत असावा असं वाटतं ही डिश समोर येते तेव्हा आजूबाजूला बर्फ का लावून आणतात काही समजत नाही ही सुद्धा एक डिश आहे की हिचा दर किती असावा याबद्दल काही थंबरूल होत नाही दहा पिसेस असले तरी 75 रुपयाला असू शकतात आणि पाच पिसेस असले तर 125 रुपयांना असू शकतात मसाला पापड 20 रुपयापासून पन्नास रुपयांपासून वाटेल त्या दराने मिळू शकतो काही वेळा तर असं वाटतं पन्नास रुपये असेच देऊन टाकावे याचे कारण ते देऊन तो मसाला पापड खायचा आणि व्हॅल्यू फॉर मनी नाही म्हणून त्रासायचे यापेक्षा निदान दान दिल्याचं तरी समाधान मिळेल
त्यानंतर या मेनू कार्डचं गणित असं आहे की व्हेज चे 75 पेक्षा कमी पदार्थ असले तर हॉटेल
” क ” दर्जाचं मानलं जातं पुन्हा मेन कोर्स व्हेज असेच सगळीकडे लिहीतील असे नाही उगाच डोक्याला ताप म्हणून आमच्या बागेतून फ्रेश फ्रॉम द फार्म…कुछ हराभरा…अशी नावं देतात काही वेळेस या मेनू कार्डमुळे फालतू मनस्ताप होतो सगळं जग फिरून आल्यावर पुणे सोलापूर हायवे वरचा एखाद्या रोड किनारी असणारा ढाबा किंवा हॉटेलमध्ये आपल्या गल्लीतल्या वाटाण्याच्या रश्याची उसळ लादीचे दोन पाव बरे वाटावे अशी माणसांची अवस्था होते या सदरामध्ये फक्त एक शब्द लक्ष वेधून घेतो तो म्हणजे ” स्पेशल ” हा शब्द समजा मटर पनीर 110 रुपये असं लिहिलेलं असलं तर त्याखाली स्पेशल मटर पनीर लिहिलेला असतं 150 रुपये प्रश्न 40 रुपयांचा नाही प्रश्न स्पेशल मध्ये खास स्पेशल काय असतं तर उत्तर असतं म्हंजे थोडा ड्रायफ्रूट आता हैं उसमे l आता मला सांगा चाळीस रुपयाला असे किती ड्रायफ्रूट येणार तर थोडा ड्रायफूट म्हणजे चार-पाच टूटीफ्रूटी आणि दीड काजूचे काप म्हणजे अर्धे तीन हे बघून डोकं फिरतं पण करणार काय कारण त्यातले ते ड्रायफ्रूट काढून परत देऊन चाळीस रुपये परत मागता येत नाही त्यावर हॉटेलवाला समजतो हे उष्टे आहेत अब ये कोई खायेगा नही l काढून दिले तरी तो बिल दीडशे रुपये लावतो आता कशातही इवलेसे ड्रायफूट टाकून 40 रुपये ज्यादा लावायचे याला काही अर्थ नाही
हा स्पेशल नावाचा जो शब्द आहे तो स्पेशली डोकं उठवतो कारण आणखी एक प्रकार म्हणजे हॉटेलचं नाव समजा निसर्ग असेल तर सर्वात शेवटी एक ” निसर्ग स्पेशल व्हेज ” असं काही तरी असतं आणि त्याचा रेट थेट 50% नी जास्त असतो इतर भाज्यांपेक्षा त्यात काय मिळतं हे विचारल्यावर तीन कलर मे सब्जी आता है l अलग अलग टेस्ट हैं l तीन लोगों के लिए काफी है l चार लेगो को नही पुरा पडेगा l असं उत्तर मिळतं आणि आपण चौघं आहोत याचा कधी कधी पश्चाताप होतो त्यामुळे मेनू कार्डतील स्पेशल शब्दापेक्षा महाभयंकर मनस्तापाचे ठिकाण म्हणजे एक बेसिक पदार्थ घेऊन त्याला विविध गावांची नावं देणे हे होय म्हणजे बघा हे करताना फाळणीला 60 वर्षाहून अधिक वर्षे झाल्याचे पण माणूस क्षणभर विसरतो व्हेज लाहोरी… पेशावरी… अफगाणी…हिमालयन..पहाडी पटियाला… बंजारा… सुरती.. अमृतसरी…राजधानी. काकीनाडा…कारवारी…मंगलोरी…इंदोरी…हैद्राबादी मद्रासी…मुंबई स्पेशल…असे व्हेजचे साधारण वीस पंचवीस प्रकार असतात
या मधलं कोणतंही नाव निवडून प्रश्न विचारला वेज काकीनाडा मे क्या आता है l आता मूळ म्हणजे काकीनाडा नेमकं कुठं आहे तिथली खाद्य संस्कृती काय हे ह्यालाच माहिती नसतं तर ही आपल्याला काय सांगणार तरी पण उत्तर ठरलेलं मिक्स व्हेज आता हैं, थिक ग्रेव्ही आता हैं l आता मिक्स व्हेज म्हणजे नेहमीचचं गाजर…पनीर… फरस बी… फ्लावर… सिमला मिरची… याच्यापुढे काही पण नसतं या वीस पंचवीस पैकी काही पण मागवा येणार कॉमनच येडं बनवायचा धंदा आणि खाणारा लई शाणा त्याच्यामुळे नुसती नावं ऐकूनच निम्मी भूक भागलेली असतीय कारण नुसती नावं ऐकूनच तोंडाला पाणी सुटलेलं असतयं तसं बघायला गेलं तर साधं उदाहरण बघा संगमनेर आळेफाटा रस्त्यावर व्हेज हिमालयन कोण खाणार एक तर शेतकरी अथवा ग्रामीण वर्ग आणि अजून म्हणजे सर्व पदार्थ जैन स्टाईल मध्ये मिळतात आता ही स्टाईल म्हणजे कांदा…लसूण… टोमॅटो… यांना डच्चू… खाली एक टिप्पणी असते दहा रुपये एक्स्ट्रा… रॉ मटेरियल कमी करून सुद्धा भाव वाढवण्याची कृती या जैन शब्दांमध्ये आहे ती पण मेनू कार्ड मार्फत त्यामध्ये पण बंजारा…लाहोरी… थोडीशी महाग भाजी असते लाहोरी मध्ये सुका मेवा असतो त्यापेक्षा अफगाणी महाग कारण त्यात अंडे फेटून घालतात असं म्हणतात व्हेज अफगाणित काय फेटून घालत असतात कोण जाणे त्यापेक्षा अंडा अफगाणी मध्ये काय फेटून घालत असतील कल्पना न केलेली बरी
आत्तापर्यंत आपण शाकाहारी मेनू कार्ड पाहिलेत आता जरा मांसाहारी कार्ड पण पाहू व्हेज मध्ये ज्या स्पेशलिटी कडे अनावधानाने डोळेझाक केलेली असते ती स्पेशलिटी प्रमुख म्हणावी लागेल ती म्हणजे ” कोल्हापुरी ” वास्तविक कोल्हापूरचे ओरिजिनल मटन किंवा चिकन कधीही अति तिखट नसतं पण कोल्हापुरी नावाखाली इतरत्र जे मिळतं ते तिखट ओतून मिळतं या कोल्हापुरी पदार्थांना मूळ पदार्थापेक्षा दहावीस रुपये जास्त लावलेले असतात आता गंमत बघा एग अफगाण करी या पदार्थाला काहीतरी अर्थ असेल का पण माणूस ते वाचत जातो कुठे अफगाणिस्तान आणि कुठे आपण एका सामान्य हॉटेलमध्ये बसलेलो सर्वात मोठी समाधानाची बाब म्हणजे मांसाहारामध्ये महाराष्ट्रातील मालवण…कोल्हापूर…अन नागपूर या तीन प्रदेशांना बऱ्या पैकी प्रतिनिधित्व मिळतं मांसाहारामध्ये शक्यतो ” हैद्राबाद ” या शब्दाला विशेष महत्त्व या शहराच्या नावावरून बिर्याणी असेल तर सामान्य बिर्याणी पेक्षा 5 – 25 रुपये अधिक मिळवता येतात
अन त्यात आज-काल असं झालंय तिचं तिचं नावं वाचून माणसं पण कंटाळलीत याचा अंदाज घेऊन एका थाळी सिस्टीम वाल्यानं नाव बदललं चिकन ताट..मटन ताट…मच्छी ताट…जरा ताट वगैरे म्हणलं म्हणजे घरगुती फील वाटतो त्याच्याशी स्पर्धा म्हणून समोरच्याने लिहिलं कोंबडी ताट…बोकड ताट… मच्छी ताट… ही जास्त अशी जवळची भाषा वाटायला लागली की इकडे गिऱ्हाईकांची गर्दी जास्त ही वाचून असं वाटत असेल जे हॉटेल समुद्री पदार्थावर चाललेले असतात त्यांच्या मेनू कार्डवर भला मोठा खेकडा दाखवलेला असतो नंतर आपले चायनीज म्हणजे मोठ्या तापलेल्या तव्यावर किंवा कढईमध्ये एका पाठोपाठ एक असे पदार्थ सर्रास ग्राहकांसमोर बनवले जातात तव्यावर फ्राईड राईस बनवताना ठाण ठाण आवाज करत पदार्थ हवेत उडवत कढईत टाकले नव्हे फेकले जातात आचारी बहुतेक नेपाळी असतो
वाटेल त्या रंगाचा कांदा… आणि पात…अन कोबी…ती तव्यावर भिरकवत नव्हे आपटतचं असतो वरून पातेल्याने भात ओततो एवढा पसारा करण्यापेक्षा आपलं गाव…जराशी बाहेरून गेलेला हमरस्ता… जिथं एस टी थांबते…ते ठिकाण त्याला सडक म्हणतात…काही नसलं तरी दोन-चार पोत्याची पालं लावलेली…चहा… नाश्ता…आणि थोडीशी मिठाई असलेली हॉटेलं…तिथेच एखादं दुसरं पानाचं दुकान तिथं पण बिडी आहे तर काडी नाही… पानांमध्ये बडीशेप आहे तर गुंजपत्ता नाही…असलं ती पानाचं दुकान पण तरुण वर्गांचं पर्यटन स्थळ त्या हॉटेललात गेल्यावर कसलं आलयं मेनू कार्ड मालक आणि वेटर म्हणजे दोन्ही पण आपला नेवऱ्या एकटाच त्याचं नाव निवृत्ती गेल्या गेल्या गदागदा हलणाऱ्या टेबलावर दोन-चार बोटं पाण्यात बुडवून जर्मली गिलासात पाणी समोर आणून ती पाण्यानी भरल्याली जर्मली गिलास टेबलावर आपटणारा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here