क्राइममहाराष्ट्र

धक्कादायक! किरकोळ कारणावरून पत्नीचा चिरला गळा, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! किरकोळ कारणावरून पत्नीचा चिरला गळा, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

घरातील किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरल्याची घटना लातूर शहरातील सोनानगर परिसरात घडली. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संदर्भात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील सोनानगर येथे माहेर असलेल्या अंकिता प्रविण जाधव यांचे गतवर्षीच लग्न झालेले होते. मागील वर्षभरापासून पुणे येथे वास्तव्यास असलेले हे जोडपे ४-८ दिवसांपूर्वी लातुरात सोनानगर येथे भाड्याने राहात होते. पती प्रविण जाधव हा दारू पिवून त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला आणि यावेळी त्याने घरातील धारदार चाकूने वार करुन पत्नीचा गळा चिरला.


त्यांच्या आरडाओरड करण्यामुळे शेजारील लोक गोळा झाल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. गंभीर जखमी अवस्थेत अंकिता यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

त्यांची प्रकृती चिंताजनक असून पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

litsbros

Comment here