माढा

कुर्डुवाडीचा इतिहास भाग-४

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माधव स्मृती रुग्णालय कुर्डुवाडी च्या वैद्यकीय सेवेचे होते आधारस्तंभ

कुर्डुवाडी ( राहुल धोका)

खेड्यापाड्यात पसरलेल्या असंख्य गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर मंडळींनी खेड्यात जावे असा आग्रह धरला जातो पण चांगल्या प्राप्तीच्या आशेने आजही मोठ्या शहरातच डॉक्टरांचे केंद्रीकरण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस जनरल सर्जन ही पदवी संपादन केलेले डॉ अशोक वागळे याला आपवाद राहिले तर कुर्डूवाडी सारख्या वीस हजार लोकवस्तीच्या दुष्काळी अविकसित भागात येऊन त्यांनी ग्रामीण सेवा करण्यास प्रारंभ केला त्यानी केलेल्या परिश्रमामुळे डॉ वसंतराव देसाई यांनी केलेल्या माधव स्मृती रूग्णालयाच्या माध्यमातून संपूर्ण माढा तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना उपचार प्राप्त होऊ लागले.

याठिकाणी रुग्ण अत्यंत विश्वासाने धाव घेत असतात
डॉ. अशोक वागळे हे मूळचे करवीरचे जी.एस मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस.ची पदवी संपादन केली तर के .ई . एम मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम एस (जनरल सर्जन) पूर्ण केले त्यानंतर हॉस्पिटल मध्ये आपल्या मामा ला दिलेल्या शब्दाप्रमाणे ते १९६५ मध्ये आले कुर्डूवाडी येथे १९६५ मध्ये विजेची सोय नव्हती.

हेही वाचा “कुर्डुवाडीचा इतिहास” भाग -१

माढा तालुक्यातील पहिले MBBS डॉक्टर करंदीकर..व तालुक्याची वैद्यकीय वाटचाल; वाचा कुर्डुवाडीचा इतिहास भाग- २

कुर्डुवाडी वैद्यकिय सेवेची वैभवशाली परंपरा; भाग- ३

त्यामुळे रुग्ण साठी तपासण्यासाठी कुर्डूवाडी सारख्या लहान खेडयात डॉक्टर नी सिमेन्स कंपनीचे एक्स-रे मशीन खरेदी केले होते व त्या नंतर त्या साठी जनरेटर हि खरेदि करुन त्या द्वरे निदान केले जात.

शस्त्र क्रिया विभाग, भूलतज्ञ विभाग, स्त्रीरोग विभाग,व फिजिशयन असे चार स्वतंत्र विभाग होते
पुढे त्यामध्ये भर पडून सात स्वतंत्र विभाग सुरू झाले
डॉ वागळे व रुग्णालयाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी उत्पन्ना न लपवता संपुर्ण आयकर भरत आसत या रुग्णालयात १९८६ मध्ये अल्ट्रासोनोग्राफी हे उपकरण त्यांनी आणले.

अत्याधुनिक देशी व परदेशी बनावटीची वैद्यकीय चिकित्सा उपकरणे आणली त्याद्वारे रोगांची चिकित्सा केली जात या वैद्यकीय चिकित्सा उपचार केंद्राचे यंत्र खरीदी चा प्रचंड बोजा रुग्णालयावर पडतो मात्र ग्रामीण भागातील गरीब रुग्णांकडून त्या प्रमाणात भरपाई मात्र होऊ शकत नाही तरी सुद्धा नवनवीन उपकरणे अन्याचा डॉ वागळे यांचा प्रयत्न होता.

सतत हसतमुख असलेले चैतन्य मूर्ती डॉक्टर अशोक वागळे नेहमी प्रसिद्धी पासून दूर राहता दररोज त्यांच्याकडे तपासणीसाठी ओ.पी.डी मध्ये दीडशे ते दोनशे रुग्णांची गर्दी असत या रुग्णालयात सात तज्ञ डाॅक्टर, २० नर्सिंग स्टाफ ,लॅब, एक्सरे , आदिचे टेक्निशयन ,वार्डबाॅय, सफाई कामगार , असा ८० पेक्षा आधिक सेवकवर्ग अंखड व अविरत रुग्ण सेवा देत असत.

डॉ दीक्षित डॉ गद्रे डॉ पारनाईक सारखे विश्वासु व निशनात टीम मुळे हास्पिटल ची किर्ती दुर पर्यंत पसरली होती. हॉस्पिटल चा आरोग्य सेवे चा नंदिदिप ५० वर्ष त्यानी तेवत ठेवला ६९ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यानी निवृत्तीची घोषणा करून पुणे येथील कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट सह्याद्री ग्रुप हॉस्पिटल कडे सपुर्त केले.

त्यानंतर पुण्याच्या सह्याद्री ग्रुपने पुढे तीन-चार वर्षे हॉस्पिटल चालू ठेवले होते पुढेही सुरूच ठेवण्याचा प्रयत्न केला तथापि कुर्डूवाडी सारख्या ग्रामीण भागात कोणत्याही शाखेचे उच्च पदवीधर डॉक्टर येण्यास तयार होत नसल्यामुळे केवळ डॉक्टरांच्या अभावामुळे हॉस्पिटल आज बंद पडले आहे
( साभार : माहिती श्री सुरेश शहा )

litsbros

Comment here