क्राइमताज्या घडामोडीबार्शीसोलापूर जिल्हा

कुर्डुवाडी- बार्शी रोडवर शेंद्री फाट्याजवळ भिषण अपघात;बार्शीतील युवकाचा जागीच मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुर्डुवाडी- बार्शी रोडवर शेंद्री फाट्याजवळ भिषण अपघात बार्शीतील युवकाचा जागीच मृत्यू

कुर्डुवाडी:काल सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या भिषण अपघातात बार्शी येथील एका २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर शेंद्री फाट्यानाजीक पोकळे वस्तीजवळ झाला.आयशर टेम्पो व मोटरसायकलची धडक होवून    मोटरसायकलस्वार ठार झाला. विजय बाबुराब घाडगे असे अपघातातील युवकाचे   नाव आहे.

 या मिळालेली माहिती अशी की,विजय हा मूळचा माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील असून तो काही दिवसांपूर्वी बार्शी येथे स्थायिक झाला होता.६ महिन्यापूर्वी   बार्शी येथे सद्गगुरू मोबाईल शॉपी सुरू केली होती.काल झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना वाली कोण ? करमाळा एसटी आगारातील तब्बल ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; हतबल एसटी चालक म्हणतो ‘आता मरणाचीच परवानगी द्या म्हणावं’

पक्षी सप्ताह विशेष:पक्षी वनांचे वैभव,चला त्यांचे संरक्षण व संवर्धन करु; अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे आवाहन

अपघातानंतर बिगर नंबरचा आयशर टेम्पोसह चालक पसार झाला. मृताचा मावसभाऊ सुरेश भारत माने याने दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पोच्या अज्ञात चालकाविरोधात बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पो कॉ सिरसट करत आहेत.या युवकाच्या जाण्याने मित्र परिवार व कुटूंबावर शोककळा पसरली आहे.परीसरात हळहळ व्यक्त होता आहे.

litsbros

Comment here