केत्तूर येथे श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी

 केत्तूर येथे श्रीदत्त जयंती  उत्साहात साजरी

केत्तुर ( अभय माने ) केत्तूर (ता.करमाळा) येथे मंगळवार ( ता.26) रोजी श्रीदत्त जन्म सोहळा सायंकाळी 6.35 वाजता मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ जय गुरुदेव दत्त च्या जयघोषात जमलेल्या भाविकांनी फुलांची उधळण केली तसेच फटाक्याची आतंकवादी करण्यात आली.

मंगळवारी सकाळपासूनच मंदिरासमोर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होमहवण ही करण्यात आले. श्रीदत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला श्री दत्त जयंतीसाठी पाेमलवाडी, पारेवाडी, गोयेगाव, वाशिंबे, गुलमोहवाडी, हिंगणी, आणि परिसरातून भाविकांनी हजेरी लावली होती. नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी असे कार्यक्रम भक्तीभवाने यावेळी करण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात ‘या’ गावांत तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर; क्लिक करून वाचा, कोणती गावे?

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक ‘या’ तारखेपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणं बाबत अहवाल येणार : गणेश चिवटे यांची माहिती

श्रीदत्त जयंती सप्ताहानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, योगा शिबिर, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहादरम्यान कीर्तन झाल्यानंतर रोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. या सप्ताहामध्ये ह.भ.प.गुलाब महाराज भराटे, आप्पा महाराज भुसनर, अनिरुद्ध महाराज निंबाळकर, सागर महाराज बोराटे, पांडुरंग महाराज उकले, श्यामसुंदर महाराज ढवळे, रमेश महाराज शिवापुरकर यांची कीर्तनसेवा झाली तर शेवटच्या दिवशी रमेश महाराज शिवापुरकर (सोलापूर) यांचे श्रीदत्त जन्माचे कीर्तन झाले.तर बुधवार(ता.27) रोजी गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक होऊन काल्याचे किर्तन होणार असून सप्ताहाची सांगता होणार आहे.

karmalamadhanews24: