केत्तूर परिसरात भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

केत्तूर परिसरात भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

केत्तूर (अभय माने) गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया,गणपती चालले,गावाला चैन पडेना आम्हाला… या जयघोषात लाडक्या गणरायाला करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तूर परिसरात पारंपारिक पद्धतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सकाळी नऊ वाजता केत्तूर येथील सुयश स्पेशल गार्डन्सच्या गणरायाचे शांततेत विसर्जन केले तर पारेवाडी रेल्वे कॉलनीच्या गणेश मंडळाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले.तर बजरंगबली गणेश मंडळाने रात्री उशिरा गणरायाचे विसर्जन केले.तत्पूर्वी नेताजी सुभाष महाविद्यालयाच्या गणेश मूर्तीचे सातव्या दिवशी तर किर्तेश्वर गणेश उत्सव मंडळाने दहाव्या दिवशीच विसर्जन केले. यावेळी गुलाल व फटाक्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.त्यामुळे प्रदूषण कमी प्रमाणात झाले.

हेही वाचा – कुंभेज येथे विद्यार्थ्यांनी घेतली आगळीवेगळी प्रतिज्ञा; वाचा सविस्तर

32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा

शेवटच्या दिवशी घरगुती गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्तींचे उजनीच्या अथांग पाण्यात विसर्जन केले व जड अंतकरणाने गणरायाला निरोप दिला.परिसरातील केत्तूर नं.1 येथील मोरया प्रतिष्ठानच्या गणेश मंडळाचे तसेच हिंगणी येथे मोरया गणेश उत्सव मंडळ,भैरवनाथ प्रतिष्ठान मंडळ,तसेच जय गणेश तरुण मंडळ यांनी गावाजवळील विहिरीत गणरायाचे विसर्जित केले तर गुलमोहरवाडी येथे गणेश तरुण मंडळाने विहिरीत विसर्जित केले तर पोमलवाडी येथे गणेश मंडळांनी आपापल्या गणेशाचे विसर्जन केले.परिसरात सर्वत्र कसलेही प्रकारची गालबोट न लागता शांततेत पार पडले.

karmalamadhanews24: