श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये पर्यावरणीय रक्षाबंधन कार्यक्रम साजरा
केम प्रतिनिधि:श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज केम याठिकाणी एक नवीन उपक्रम म्हणून पर्यावरणीय रक्षाबंधन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ सुनिता सातव मॅडम उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री विष्णू कदम हे होते.
यावेळी कॉलेजच्या आवारात लावलेल्या झाडांना वेगवेगळ्या राख्या बांधून ती झाडे जतन करण्याचा निर्धार सर्वांनी केला.सध्या निसर्गाचा पर्यावरणीय असमतोल होत असल्यामुळे हानी होत आहे. त्यामुळे या सामाजिक नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निसर्ग संवर्धन व पर्यावरणीय रक्षण करण्याचे सर्वांनी ठरवले.
या कॉलेजमधील विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.रजिया पठाण, कु.सानिया कोळी , कु.दिव्या चव्हाण इ. मुलींनी हा उपक्रम राबविला. यावेळी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे , प्रा. संतोष साळुंखे , प्रा. संतोष रणदिवे, प्रा.अमोल तळेकर, श्रीमती मनीषा कुंभार ,सौ.प्रिती राऊत , श्रीमती शोभा समुद्र ,पर्यवेक्षक श्री बापूराव सांगवे , वस्तीगृह अधीक्षक श्री सागर महानवर , प्रशालेतील सर्व शिक्षक बांधव व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comment here