करमाळाशैक्षणिक

श्री उत्तरेश्वर विद्यालय केमची शाळा व्यवस्थापन समिती नूतन पदाधिकारी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री उत्तरेश्वर विद्यालय केमची शाळा व्यवस्थापन समिती नूतन पदाधिकारी निवड

केम(संजय जाधव) ; श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम याठिकाणी शासकिय नियमानुसार शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२४ या कालावधीसाठी नवनियुक्त अशी शालेय व्यवस्थापन समितीची खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री विष्णू कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी केम, पाथर्डी, मलवडी, उपळवाटे, वडशिवणे, भोगेवाडी, जाखले या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी प्रथम सर्व उपस्थित पालकांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी प्राचार्य श्री विष्णू कदम यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची प्रकिया समजावुन सांगितली व त्यानुसार सर्व उपस्थित पालकांच्या व ग्रामस्थांच्या सहमतीने सदस्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री दयानंद बाळासाहेब तळेकर यांची, तर उपाध्यक्ष पदी उज्वला संदिप तळेकर यांची व सचिवपदी प्राचार्य विष्णू कदम तसेच संभाजी अभिमन्यू गुरव, हरिदास नामदेव बोगांळे, सुरेश साधु मोटे, दिपक अनंता तळेकर, धनाजी हरिभाऊ ताकमोगे, राहुल शांताराम रामदासी, विकास तानाजी कळसाईत, सुवर्णा अविनाश पवार, पल्लवी सचिन रणशृंगारे, अन्नपूर्णा मुकेश राऊत,

रोहिणी उत्पल भोसले, नागर शहाजी शेळके, ग्रामपंचायत नियुक्त सदस्य श्री सचिन सर्जेराव बिचितकर, शिक्षणप्रेमी नियुक्त सदस्य श्री ज्ञानेश्वर विठ्ठलराव पाटील, शिक्षकप्रतिनिधी सदस्य श्री दिलीप निवृत्ती तळेकर यांची सन्माननीय सदस्यपदी निवड करण्यात आली.

या निवडीच्या वेळीस शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मोहन आबा दोंड, मा. सभापती शेखरतात्या गाडे, अनंता तळेकर, सरदार पठाण, गणेश तळेकर, मनोजकुमार सोलापूरे, संदिप तळेकर, गोरख खानट, वसंत तळेकर सर, धनंजय सोलापूरे, बापूराव तळेकर, नरहरी दोंड, दत्ताभाऊ तळेकर, श्रीकांत दोंड, सागर तळेकर, श्री शिवाजी पाटील, संतोष रायचुरे , संजय नवले, बाळू खानट, सचिन रणशृंगारे, संतोष खानट, सुजाता अवधुत येवले, नम्रता अविनाश येवले, अनिता पांडुरंग जाधव, अमोल घोसे, संभाजी दोंड, दिलीप चांदगुडे, रोहिदास मुटेकर इ. पालक व ग्रामस्थ मोठया सख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

या निवडी बद्दल नूतन अध्यक्ष म्हणाले कि या शाळेत राजकारण न आणता हि शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन तर नूतन उपाध्यक्षा ऊज्वला तळेकर म्हणाला मी या शाळेतील मुलीना बचत करण्यासाठी व ई दहावी मधील मुलीना बचत गटामार्फत करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया त्यानी दिली.

litsbros

Comment here