करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद कात्रज शाळेचा अनोखा उपक्रम; पोलीस, STI यशस्वी गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद कात्रज शाळेचा अनोखा उपक्रम; पोलीस, STI यशस्वी गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

केत्तूर(अभय माने); जि.प्.प्रा.शाळा कात्रज (ता.करमाळा) येथे यावर्षी यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करुन शाळेतील मुलांना प्रेरणा देण्याचे काम केले. 

      कात्रज गावातील नीट परीक्षेमध्ये 609 गुण प्राप्त केलेल्या सायली रामदास पाटील व तिचे वडील रामदास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

एस टी आय परीक्षा उत्तीर्ण झालेले आकाश कांतीलाल शिंदे व त्यांच्या मातोश्री यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस भरती झालेले प्रतिक प्रभाकर पाटील व राज जयराम शिंदे व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मुर्तींनी आपले मनोगत व्यक्त करुन मुलांना प्रेरणा दिली.

 किरण काका कवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व गावामध्ये दर्जेदार वाचनालय व भरती सरावासाठी मैदान व्हावे यासाठी नागरीकांना आवाहान केले.

  सदर कार्यक्रमासाठी आजी माजी सदस्य सरपंच,पं.स.सदस्य,पोलीस पाटील पालक,व जेष्ठ नागरीक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तात्यासाहेब धायगुडे यांनी केले.

प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रकाश देवकर यांनी केले ,आभार नामदेव पाटील यांनी मानले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक लक्ष्मण कोकणे ,सुवर्णा गायकवाड व अर्चना गिरंजे यांनी सहकार्य केले.

छायाचित्र- कात्रज (ता.करमाळा) : सायली पाटील यांचा सत्कार करताना मान्यवर मंडळी.

 

karmalamadhanews24: