करमाळा

गतवर्षीचा उजनीचा ‘तो’ व्हिडिओ यंदा ही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गतवर्षीचा उजनीचा ‘तो’ व्हिडिओ यंदा ही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल

केत्तूर ( अभय माने) : गतवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ” हर घर तिरंगा “” अभियान देशभर राबविण्यात आले होते.

या अभियानास नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता या अनुषंगाने 15 ऑगस्ट 22 रोजी उजनी धरणाने 100 % ची पाणी पातळी पार केली होती व सोलापूरसाठी नदीद्वारे उजनी धरण साठ्यातून पाणी 16 दरवाजातून पाणी सोडले जात होते या सोडलेल्या पाण्यावर आकर्षक अशी तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली होती हा त्यावेळो नजारा विलोभनीय दिसत होता जणू काही “तिरंगा लेऊन नटली उजनी” असेच भासत होते.

त्यावेळी काढण्यात आलेला तो उजनीच्या पाण्याचा तिरंगा व्हिडिओ आता 26 जानेवारी 23 रोजीही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत होता तसेच बहुतेक जणांनी उजनीचे हे तिरंगा स्टेटस म्हणून ठेवले होते.

यावर्षी जास्तीचा पाऊस काळ झाल्याने राज्यातील सर्वच धरण साठ्यात जवळजवळ 100 टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. उजनी धरणातून सोलापूर साठी नदीद्वारे पाणी सोडण्यात आले असले तरी 26 जानेवारी 2023 रोजी उजणीचा पाणीसाठा 94.95 % (114.53 टी.एम.सी.) एवढा मुबलक प्रमाणात आहे.

पाणीसाठा जानेवारी महिन्यातही भरपूर प्रमाणात असल्याने असल्याने यंदाचा येणारा उन्हाळा शेतीसाठी सुसह्य जाणार असे दिसत आहे.मात्र या उन्हाळ्यात वीजपुरवठा काय करतो ? यावरच सगळे गणित अवलंबून राहणार आहे.

26 / 1 / 2023 रोजीचा पाणीसाठा

94.95 % (114.53 टीएमसी )
विसर्ग –
सिनेमा कालवा – 80 क्युसेक
नदीद्वारे – 2700 क्युसेक
वीज निर्मिती – 1600 क्युसेक

litsbros

Comment here