करमाळाशैक्षणिक

निंभोरे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निंभोरे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा

करमाळा (प्रतिनिधी): आज दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभोरे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याची सुरुवात गावांमधून प्रभात फेरी काढून विविध घोषणा देत हलगीच्या निनादात गावामध्ये जागृती करून करण्यात आली. 

      मेळाव्याचे उद्घघाटन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वळेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब वळेकर तसेच सुतार भाऊसाहेब,दिलीप मुळे,महेश वाघमारे ,आबा काशीद,भोलेनाथ गवळी,नंदू जगताप,नितीन कांबळे तसेच शालेय शिक्षण समितीच्या महिला सदस्य श्वेता जमदाडे,सदस्य कांचन गायकवाड,सपना वळेकर,सौ.काकडे,सौ.बोराडे,सौ. कळसाईत आदी उपसथित होते. 

            या कार्यक्रमाची रूपरेषा मुख्याध्यापिका श्रीमती शमशादबेगम शेख यांनी सांगितली तसेच सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक क्षमतेचे वेगवेगळ्या कृती आणि त्यांचे प्रात्यक्षिके करून घेत दाखलपात्र विद्यार्थ्यांचे नोंदणी करून घेतली.

      या प्रसंगी दाखलपात्र विद्यार्थ्यांचे पालक,शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

litsbros

Comment here