करमाळाकेम

केम येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठया उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठया उत्साहात साजरी

केम ता. करमाळा येथे 14 एप्रिल रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी 9.30 वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून पूजन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनसमुदाय उपस्थित होता. त्यानंतर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

प्रथम क्रमांक राजाभाऊ तळेकर विद्यालयाची विध्यार्थिनी कु. नंदिनी विनोद तळेकर हिने पटकवला. नंदिनी तळेकर हिने डॉ.बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित निबंध लेखन केले होते. द्वितीय क्रमांक धम्मपाल कांबळे (नुतन माध्य. विद्यालय ), व वैष्णवी शिंदे (उत्तरेश्वर हायस्कूल ) यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक सानिका मोरे (राजाभाऊ तळेकर विद्यालय ) हिला देण्यात आला.उत्तेजनार्थ सायली बिचितकर, प्राजक्ता बिचितकर, सार्थक तळेकर, दिव्या गुरव यांना देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी (अच्युत काका) पाटील, महावीर तळेकर, सागर दोंड, महेश तळेकर, संदीप तळेकर, सुदर्शन तळेकर,सचिन बिचितकर,रंदवे सर, सागरराज तळेकर, समीर तळेकर, राहुल रामदासी, धनंजय ताकमोगे, सरदार पठाण, पोलीस स्टेशनचे जाधव साहेब, शिंदे साहेब,सर्व शालेय शिक्षक स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र गाडे यांनी केले.कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विजयसिंह ओहोळ, शुभम गाडे, सचिन पोळके, सोमनाथ कांबळे, दशरथ गाडे, वसंत ओहोळ,

मुनीराज पोळके, नामदेव गाडे, योगेश ओहोळ,सचिन रणशृंगारे,प्रवीण मखरे,हर्षवर्धन गाडे,प्रणय देडगे, प्रसाद गाडे, प्रमोद गाडे,सत्यशील ओहोळ, संदीप कांबळे, अशोक ओहोळ, सागर ओहोळ, तुषार गायकवाड, भाऊसाहेब गाडे यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here