माढा

ढवळस येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ढवळस येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी

उपळवटे (प्रतिनिधी): संदीप घोरपडे

माढा तालुक्यातील ढवळस ग्रामपंचायत येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ढवळस येथील मातंग समाजाचे नेते रायबा तानाजी देवके यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतीबा फुले हे एक मराठी लेखक विचारवंत आणि थोर समाज सुधारक होते महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 कटगुण सातारा येथे झाला होता त्यांनी 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

इ.स.1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षेकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईवर सोपविली होती त्यांच्या समाजकार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली होती त्यांनी शेतकऱ्यांचे असुड गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब इत्यादी पुस्तके लिहिली आहेत अशा या महान समाजसुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 साली पुणे येथे निधन झाले महात्मा ज्योतिराव फुले यांचे महान कार्य डोळ्यासमोर ठेवून समाजाचे रक्षण करावे.

यावेळी उपस्थित

ढवळस गावचे सरपंच तुकाराम शिंदे

संतोष काळे डाॅ. गव्हाणे, राहुल अनभुले, समाधान शेंडगे जाधव, भाऊसाहेब नागनाथ वाघमोडे, सुतार मॅडम, उमेश अनभुले, समाधान इंगळे, शिवाजी मिस्कीन आदी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित होते.

litsbros

Comment here