करमाळाराजकारण

राज्यातील बाजार समित्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बाजार समिती संघाच्या माध्यमातून प्रयत्न करणार : माजी आ.जयवंतराव जगताप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यातील बाजार समित्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बाजार समिती संघाच्या माध्यमातून प्रयत्न करणार : माजी आ.जयवंतराव जगताप

करमाळा (प्रतिनिधी ) :

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या माध्यमातून तालुक्यातील असो या इतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी सांगितले .  

माजी आ.जगताप यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेबद्दल सत्कार केडगावचे सरपंच योगेश बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी पत्रकार जयंत दळवी,सुनील ढाणे, रेल्वे प्रोजेक्ट मॅनेजर श्रीकांत निंबाळकर, पिंटुशेट गुगळे आदी जण उपस्थित होते . कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांचे हित जोपासत असते इथेच खरा शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर योग्य भाव मिळतो.

 महाराष्ट्रात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या असून राज्य बाजार समिती संघ हि राज्यस्तरीय शिखर संस्था असून संघामार्फत त्यांच्या विविध अडीअडचणी आम्ही सोडवू शकतो तसेच शेतकरी हितोपयोगी शासनाच्या विविध योजना राबवता येतात .

 भविष्यात शेतकरी , व्यापारी,कर्मचारी त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील त्याच बरोबर बाजार समित्यांचे सक्षमीकरण करणेसाठी शासन दरबारी राज्य बाजार समिती संघामार्फत प्रयत्न केले जातील असेही माजी आमदार जगताप यांनी सांगितले.

litsbros

Comment here