करमाळा

..म्हणून करमाळा-अहमदनगर बायपासवरील खड्डे आम्ही बुजवत नाही! वाचा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्यांचे उत्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

..म्हणून करमाळा-अहमदनगर बायपासवरील खड्डे आम्ही बुजवत नाही! वाचा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्यांचे उत्तर

करमाळा(प्रतिनिधी) : करमाळा-अहमदनगर बायपास रस्त्यावर सहा महिन्यापासुन पडलेले जीव घेणे खड्डे बुजवा अशी मागणी करणा-यास हा रस्ता आता नॅशनल हायवे कडे वर्ग झालेला आहे, यामुळे आम्ही या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून शकत नाही असे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता देऊन मोकळे होत आहेत.

 मौलालीनगर जवळील ईदगाह मैदान शेजारी अहमदनगर बायपास रस्त्यावर गेली सहा महिने झाले जीवघेणे मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातूनच जड मालवाहतुकीची वाहने जा-ये करतात.तब्बल पन्नास मीटर अंतरात असलेल्या मोठमोठया खड्यामुळे जडवाहने खड्यात आदळत आहेत. यामुळे वाहनांचे पाटे तुटत आहेत व वाहनातील प्रवाशांचे हाडे खिळखिळी होत आहेत. 

खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारकांचे अपघात होत आहेत. बायपास वरील जीवघेणे खड्डे बुजवण्याची मागणी येथील मानवाधिकार संघटनेचे व जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य आयुब शेख यांनी गेल्या महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे वारंवार केलेली आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.

 आयुब शेख यांनी आज बांधकाम विभागाचे उप अभियंता उबाळे व कनिष्ठ अभियंता वाघ यांना रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणी केली असता सदर रस्ता नॅशनल हायवे विभागाकडे सुपूर्त केल्याने आम्ही या रस्त्यावरील खड्डे बुजवू शकत नाही असे सांगून जबाबदारी झटकली आहे.याकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शेख यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

टेभूर्णी ते जेऊर दरम्यान कंदर,कविटगाव व जेऊर उड्डाण पुल या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाची दुरूस्ती सध्या सुरू आहे.त्यानंतर हे खड्डे बुजवण्यात येतील.

– उबाळे (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग)

litsbros

Comment here