करमाळाक्रीडा

करमाळा: लव्हे येथे उद्या कर्मवीर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लव्हे इथे उद्या कर्मवीर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 
जेऊर प्रतिनिधी ( अक्षय आखाडे):  
करमाळा तालुक्यातील लव्हे येथे बुधवारी (उद्या) सकाळी ११ वाजल्या पासून कर्मवीर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे प्रथम वर्ष असून यंदा पासून प्रत्येक वर्षी ही स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे हाफ पीच वरती खेळवण्यात येणार आहेत.

लव्हे येथील एन पी ग्रुप ने या भव्य अशा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते राजन ( आण्णा) पाटील यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे. याच बरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल पाटील ( प्राचार्य भारत हायस्कूल जेऊर), पै अतुल( भाऊ) पाटील ( डबल उप महाराष्ट्र केसरी ) तसेच दिलीप ( आप्पा ) पाटील (पोलीस पाटील) आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघा साठी रोख रक्कम स्वरूपात चार पारितोषिके असणार असून प्रथम विजेत्या संघाला रोख १०,००१ रुपये चे पारितोषिक पृथ्वीराज भैया यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला देखील ७००१ रुपयाचे रोख पारितोषिक अशोक (दादा)पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. तृतीय आणि चतुर्थ संघाला अनुक्रमे ५००१ आणि ३००१ अशी पारितोषिके स्वप्नील पाटील ( महाराष्ट्र चंपियान ) आणि शुभम कोंदाळकर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. याशिवाय रोख रकमेची अन्य वयक्तिक बक्षिसे देखील असणार आहेत.

*_ठळक नोंदी_*

*स्पर्धेचे नियम व अटी*
_१) सर्व नियम सामना समितीचे राहतील. 
२) संघाला चेंडू सामना समिती कडून विकत घ्यावा लागेल. 
३) खेळाडूची जीविताची जबाबदारी स्वतः खेळाडूची राहील. 
४) प्रतक सामना ६ षटकाचा खेळवण्यात येईल तसेच प्रत्येक सामन्यात ९ खेळाडू खेळवण्यात येतील.
५) पंचाचा निर्णय अंतिम राहील पंचांशी हुज्जत घातली तर संबंधित संघ बाद ठरवण्यात येईल.
६ ) कोविड19च्या सर्व शासकीय नियमांचे पालन करावे लागेल

प्रवेश फी 
_३५० रुपये प्रयेकी संघ_

सामना खेळवण्याचे ठिकाणी :
_लव्हे – निंभोरे रोड लव्हे ता करमाळा जी सोलापूर_

litsbros

Comment here