करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

क्लस्टर युनिट आयोजित कोव्हिड जागृती कार्यशाळा कौतुकास्पद; यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे प्रतिपादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

क्लस्टर युनिट आयोजित कोव्हिड जागृती कार्यशाळा कौतुकास्पद; यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे प्रतिपादन

करमाळा(प्रतिनिधी) ; दि.२९/१०/२०२१: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कोव्हिड १९ संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, विठ्ठलराव शिंदे आर्टस् कॉलेज टेंभूर्णी, प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय करमाळा आणि भारत महाविद्यालय जेऊर गठित क्लस्टर युनिटच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव श्री विलासराव घुमरे हे होते. तसेच पु.अ. हो. सो. विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. सुरेश पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मा. कुलगुरू डॉ. फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांना चव्हाण महाविद्यालयातील एन सी सी प्रमुख लेफ्टनंट प्रा.संभाजी किर्दाक आणि लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली छात्र सैनिकांनी मानवंदना देऊन स्वागत केले. तसेच रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे आणि रा. से.यो . स्वयंसेवकांच्या विनंतीनुसार मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्रस्तुत कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून पुणे स्थित नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमधील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाबासाहेब तांदळे आणिडॉ. शैलेश पवार यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कोव्हिड समस्या ही वैद्यक शास्त्रातील ॲलोपॅथीशी जितकी निगडीत आहे तितकीच मनोविज्ञान, ॲक्युप्रेशर, आयुर्वेद आणि अध्यात्म यांच्याशी कशी संबंधित आहे हे साधार विशद केले. क्लस्टर युनिटने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे कुलगुरूंनी कौतुक केले आणि हा उपक्रम विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांनी राबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये डॉ. बाबासाहेब तांदळे यांनी कोरोनासंदर्भातील ताजी आकडेवारी सादर करून जगाच्या तुलनेत भारताची अवस्था चांगली असली तरी प्रत्येकाने मास्क वापरणे आणि अधिकाधिक वेळा साबणाने हात धुणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

डॉ. शैलेश पवार यांनी भारतातील साथीचे रोग आणि त्यासंदर्भात एन आय व्ही मध्ये सन १९५२ पासून चाल त असलेले मूलभूत संशोधन याचा
आढावा घेतला आणि एन आय व्ही च्या संशोधनामुळे भारताची आशिया खंडाबरोबरच जगात सर्वत्र प्रशंसा होत असल्याचे प्रतिपदन केले.

अध्यक्षीय समारोपामध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव श्री विलासराव घुमरे यांनी लॉक डाऊन काळात महाविद्यालयीन युवकांची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन व डॉ. तांदळे आणि डॉ. पवार यांनी केलेले मार्गदर्शन विचारात घेऊन अध्यापन करावे असे कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्राध्यापकवृंदास आवाहन केले.

सदर कार्यशाळेस प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, प्राचार्य डॉ. अनंत , प्राचार्य महादेव वाघमारे आणि पत्रकार सर्वश्री आण्णा काळे, विशाल घोलप व अशोक नरसाळे हे आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयक शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अतुल लकडे यांनी साधन व्यक्तींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप मोहिते यांनी केले तर प्रा.नितीन तळपाडे यांनी आभार मानले.

हेही वाचा – सरडे यांच्या राजीनाम्या नंतर ‘हे’ झाले करमाळा पंचायत समितीचे उपसभापती; वाचा सविस्तर

रावगाव व पांडे येथे करमाळा तालुका न्यायालय विधी सेवा समिती मार्फत “आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम संपन्न

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. विजय बिले, प्रा. डॉ. अनिल साळुंखे, प्रा. कृष्णा कांबळे, प्रा. प्रमोद शेटे, विजयसिंह साखुळ ,गणेश जाधव, गणेश वळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

litsbros

Comment here