डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर

करमाळा (अभय माने): डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, सोलापुर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची करमाळा तालुका कार्यकारीणी तालुकाध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांनी आज (दि.२ जुलै) रोजी शासकीय विश्रामगृह करमाळा येथे घेण्यात आलेल्या बैठकीत जाहीर केली आहे.

यावेळी करमाळा तालुका उपाध्यक्षपदी शितलकुमार मोटे, गौरव मोरे, सचिव पदी नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिव पदी राजाराम माने, खजिनदार पदी सचिन हिरडे, संघटक ज्ञानदेव काकडे, संपर्कप्रमुख पदी अशोक मुरूमकर, व्यवस्थापक सुर्यकांत होनप, प्रसिद्धी प्रमुखपदी अंगद भांडवलकर यांच्या निवडी केल्या असुन तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून राहुल रामदासी,धनंजय पाटील सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, सागर गायकवाड यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड. बाबुराव हिरडे, नासिर कबीर, आशपाक सय्यद, अशोक नरसाळे, डि.जी. पाखरे यांची निवड करण्यात आली आहे.

या प्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष मडके म्हणाले की, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनमान्यता दिली असुन केंद्र राज्य शासनामार्फत त्याची प्रकिया सुरू आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या संकल्पनेतुन व अथक प्रयत्नांमधून डिजिटल मिडिया पत्रकारितेला अधिमान्यता मिळाली आहे. 

राजा माने यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्द राहुन काम करणार आहे.

याबरोबरच प्रिंट मिडिया प्रमाणेच डिजीटल मिडियाला शासनाच्या जाहिराती व अधिस्विकृती मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. 

पत्रकार सुरक्षा विमा योजना, पत्रकार कुटुंब कल्याण योजना, पेन्शन योजना, पत्रकारांची शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघ कार्यरत राहणार असल्याचे डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सांगितले.

karmalamadhanews24: