पावसासाठी करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी केली ईदगाह मैदानावर प्रार्थना

पावसासाठी करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी केली ईदगाह मैदानावर प्रार्थना

करमाळा (प्रतिनिधी): पावसाळा सुरू होऊन तब्बल तीन महिन्याचा कालावधी लोटत आला तरीही पावसाचा कोठेही थांगपत्ता नाही रुसलेल्या पावसासाठी आज करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर जाऊन नमाज पठण करून प्रार्थना केली.

करमाळा शहरातील सात मशिदी मधील प्रमुख धर्मगुरू अर्थात मौलाना यांनी एकत्रित येऊन करमाळा शहराबाहेरील करमाळा गुलसडी रोड वरील ईदगाह मैदान येथे आज दुपारी अडीच वाजता पाऊस पडावा तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य आबादीत राहावे या प्रमुख मागणीसाठी आज शहरातील सुमारे एक हजार मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा करून

अल्लाह अर्थात परमेश्वराकडे पावसासाठी प्रार्थना केली यावेळी करमाळा शहरातील मौलाना मोहसीन शेख यांनी नमाज व खुदबा पठण केले यावेळी शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी अल्लाहाकडे दुवा च्या माध्यमातून भरपूर पाऊस पडावा अशी प्रार्थना केली यावेळी नुरानी मशीदचे मौलाना मरगुबुल हसन, मरकस मशिदचे मौलाना सिकंदर शेख, जुम्मा मशिदचे मौलाना हाफिज अन्वर, अरफात मशिदचे मौलाना हाफिज इरकाम, आयेशा मशीद चे मौलाना सय्यद अन्वर माआयंशा मशिद चे मौलाना अबुरेहान कुरेशी, दर्गाह मशीद मौलाली नगर चे मौलाना वाजिद शेख हे मौलाना यावेळी उपस्थित होते करमाळा शहर व तालुक्यात पाऊस पडावा या मुख्य मागणीसाठी करमाळा मुस्लिम बांधव आज आणि उद्या पावसासाठी मैदानावर आणखीन प्रार्थना करणार आहे असे मौलाना कादिर शेख यांनी बोलताना सांगितले.

करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी पावसासाठी ईदगाह मैदान येथे नमाज अदा करून प्रार्थना केली त्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने पावसाच्या हलक्या सरी करमाळा शहरात कोसळल्या.

karmalamadhanews24: