करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात दसरा व दिवाळी सणानिमित्त हरभरा डाळीचे वाटप 

करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात दसरा व दिवाळी सणा निमित्त हरभरा डाळीचे वाटप    

करमाळा(प्रतिनिधी); देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भारत सरकार च्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेड यांच्या वतीने खास दसरा सण व दिवाळी सणा निमीत्त नागरिकांसाठी मागेल त्याला ६० रु . किलो या सवलतीच्या दरात भारत डाळ च्या नावाने एक आधार कार्ड वर ५ किलो हरभरा डाळ वाटपाची प्रत्यक्ष सुरुवात दि १८ आक्टोबर रोजी सकाळी १० वाजले पासून भाजपा युवामोर्चाचे जिल्हा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या हस्ते विद्यार्थी अन् पालकांना करण्यात आली.

 विद्यार्थ्याना व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने शाळेत या डाळीचे वाटप करण्यात येत असून देशभरातील नागरिकांसाठी ही योजना असून आपल्या तालुक्यातील नागरीकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक व खरेदी- विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी यावेळी केले 

दि. १२ आक्टोबर रोजी त्यांच्या हस्ते मार्केटयार्ड करमाळा येथे उद्घाटन करण्यात आले होते . या वाटपाची प्रत्यक्ष सुरवात आज करण्यात आली.

 

यावेळीखरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा बाजार समितीचे नुतन संचालक भा . यु . मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभुराजे जगताप , प्रभारी प्राचार्य अनिस बागवान , पर्यवेक्षक बाळकृष्ण पाटील , पर्यवेक्षिका नवले मॅडम , विज्ञान शाखा विभाग प्रमुख विजय पवार , सर्व शिक्षक शिक्षीका ,भा . यु .मोर्चा चे युवा कार्यकर्ते , पालक व विद्यार्थी – विदयार्थिनी उपस्थित होते.

karmalamadhanews24: