करमाळाक्राइम

मनोहर भोसलेला करमाळा कोर्टाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी; फरार साथीदार व पुरावे ताब्यात घेणेसाठी..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मनोहर भोसलेला करमाळा कोर्टाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी; फरार साथीदार व पुरावे ताब्यात घेणेसाठी..

करमाळा(प्रतिनिधी) ; स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणून घेणारा करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील आश्रमातील भोंदूबाबा व बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर भोसले यास करमाळा पोलीसांनी आज न्यायालयात हजर केले. आज २१ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता करमाळा न्यायालयातील न्यायाधीश आर.ए. शिवरात्री यांचेसमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने भोसले यास सात दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

भोंदू मनोहर भोसले याच्याविरूध्द ८ सप्टेंबरला रात्री नऊ वाजता सोलापूर येथे पिडीत महिलेवर अत्याचार केल्याबाबतचा शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ९ सप्टेंबरला पहाटे चार वाजता करमाळा पोलीस कार्यालयात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ९ सप्टेंबरलाच जादुटोणा व फसवणुक प्रकरणी बारामती पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भोसले पळून गेला होता.

दुसर्या दिवशी १० सप्टेंबरला पुणे पोलीसांनी सालपे, ता.लोणंद, जि.सातारा येथील एका फार्म हाऊसवरून भोसले यास अटक केली. त्यानंतर बारामती पोलीसांनी भोसले यास न्यायालयात हजर केले असता सुरूवातीला पाच दिवस तर दुसऱ्यांदा तीन दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर काल १९ सप्टेंबर रोजी भोसले यास बारामती न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केल्यानंतर करमाळा येथील गुन्ह्यातील तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले याची तपासणी कामी मागणी केली. ती मागणी बारामती न्यायालयाने मंजूर केल्यावर भोसले यास करमाळा येथे आणले व अटक करून आज न्यायालयात हजर केले.

हेही वाचा- तृप्ती देसाईं सोबतच बार्शीच्या ‘या’ सुप्रसिद्ध मराठी कीर्तनकार ही दिसणार मराठी बिग बॉसच्या घरात!

करमाळा शहरातील नागरिकाचा प्रामाणिकपणा; सापडलेले रोख दोन लाख रुपये केले पोलिसांच्या स्वाधीन

आज सोमवारी दुपारी एक वाजता मनोहर भोसले यास न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायाधिशांनी भोसलेला पोलीसांच्या विरूध्द काही तक्रार आहे का..? हे विचारले असता, भोसले यांनी तक्रार नाही असे सांगितले. त्यानंतर तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले याने दैवी चमत्काराच्या नावाखाली पिडीत महिलेची फसवणूक करून तिच्या इच्छे विरूध्द तिच्यावर बलात्कार केला आहे. त्या अनुषंगाने काही चिठ्या तसेच काही कपडे ताब्यात घ्यावयाचे आहेत.

या फिर्यादीतील आणखी दोन आरोपी म्हणजे नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे व वैभव वाघ हे दोघे फरार आहेत. त्यांना अटक करायची आहे. यासह अन्य १७ कारणे पोलीसांनी पोलीस कोठडी मागणीसाठी दिलेली होती व १० दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती.

त्यानंतर भोसलेच्या बाजुने ॲड.रोहित गायकवाड व ॲड.हेमंत नरूटे या दोघांनी युक्तीवाद केला. तर सरकारी वकील ॲड.सचिन लुणावत यांनी सरकारी बाजू मांडली. व शेवटी कोर्टाने भोसले यास ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

मग करमाळा पोलिसांनी भोसले यास पुन्हा कडेकोट बंदोबस्तात करमाळा पोलीस स्टेशन पोलीस कोठडीत ठेवले आहे.

litsbros

Comment here