करमाळा

मागासवर्गीय सरपंचाला चपलेचा हार; करमाळा तहसील समोर निदर्शने

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मागासवर्गीय सरपंचाला चपलेचा हार; करमाळा तहसील समोर निदर्शने

करमाळा(प्रतिनिधी) ; अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कासारे गावचे सरपंच यांना जातिवादी लोकांनी चपलेचा हार गळ्यात घालून त्यांचा अवमान केला या घटनेचा निषेध नोंदवत रिपाई आठवले पक्षाच्यावतीने नागेश दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.

यावेळी अहमदनगर जिल्हा अत्याचार प्रवण क्षेत्र जाहीर करून दलितांना शस्त्र परवाने द्यावेत व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन करून महाराष्ट्रातून हद्दपार करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

हेही वाचा- सोलापूर जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

डॉ राहुल कोळेकर यांच्या वेतनाची विभागीय चौकशी करण्यात यावी; यासह ‘हे’ गंभीर आरोप

याप्रसंगी युवानेते यशपाल कांबळे,सूहास ओहोळ, भीमराव कांबळे सर ,लक्ष्मणरावजी भोसले,कांबळे प्रसेंजित कांबळे, शहाजी अवचर अशोक पोळके सुरेश खरात मयूर कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here