करमाळामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराज्यसोलापूर जिल्हा

सोशल मिडीयावर चढाओढ.. “काय झाडी…काय डोंगार… काय हाटील… सगळ कसं ओक्के…”

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोशल मिडीयावर चढाओढ.. “काय झाडी…काय डोंगार… काय हाटील… सगळ कसं ओक्के…”

केतूर ( अभय माने ) सध्या राज्यात शिवसेनेतील बंडाळीचे पडसाद उमटत असताना सोशल मीडियावर यावर धमासान सुरू असल्याचे चित्र आहे. ठाकरे यांची बरोबर की शिंदे यांचे बरोबर यावर चढाओढ लागली आहे.

करमाळा तालुक्याच्या राजकीय अथवा मित्र कंपनी तसेच घरगुती ग्रुपवरही सर्वजण चालू राजकीय घडामोडीवर स्टेटस ठेवत आहेत यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप कार्यकर्त्यांमध्ये जणू काही स्पर्धाच काढली आहे.

काही राजकीय ग्रुपवर तसेच फेसबुकवर जुने व्हिडिओ, स्टेटस ठेवून एकमेकांवर कुरघोड्या केल्या जात आहेत. सध्याचे सरकार जाणार ? की राहणार. पंढरपूरची एकादशीची श्री विठ्ठलाची पूजा कोणता मुख्यमंत्री करणार ? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

शरद पवारांच्या पन्नास वर्षाच्या राजकीय संघर्षाचे दाखले दिले जात आहेत. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती येथून पुढे हे बंडखोर आमदार गुवाहाटी मुक्कामी गेले आहेत तेथे असणाऱ्या वातावरणाविषयी झाडे, हिरवळ,हाटील ..…. ही क्लिप महाराष्ट्रभर वायरल झाली आहे.

 

गोवाहाटीमध्ये काय लपता चर्चा करण्यासाठी मुंबईत येऊन बहुमत सिद्ध करा. एक ना एक दिवस तुम्हाला मुंबईत यावच लागेल हे संजय राऊत बोलत आहेत. नेते चालले पैशाच्या मागे.निष्ठा हिंदुत्व ह्या फक्त बोलण्यापुरत्या गोष्टी आहेत. कार्यकर्ता मात्र कायमच उचलतो सतरंज्या. यावरून कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा.

नेते मालामाल होतात तर कार्यकर्ते कायमच कंगाल होतात.,आमदार अब्दुल सत्तार कोणत्या हिंदुत्वासाठी बंडखोर गटात सामील झाले हा प्रश्नही सर्वत्र विचारला जात आहे.तसेच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी…. काय डोंगार… काय हाटील…सगळं कसं वोक्के व्हिडिओने तर सर्वत्र धमाल सोडून दिली आहे.

तर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मात्र आपण भाजपात जाणार नाही शिवसेनेतच आहोत. शिवसेना सोडली नाही व सोडणार नाही हे ठासून सांगत आहेत.आता या पुढे काय होणार हा ” सस्पेन्स ‘ मात्र कायम राहिला आहे.

litsbros

Comment here