करमाळासोलापूर जिल्हा

वाचन सेवा घरोघरी नांदली पाहिजे, संत ज्ञानेश्वर वाचनालय करमाळास पुस्तके भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाचन सेवा घरोघरी नांदली पाहिजे, संत ज्ञानेश्वर वाचनालय करमाळास पुस्तके भेट

करमाळा: सार्वजनिक वाचनालये ही त्या त्या गावची ज्ञानमंदिरे आहेत. दर्जेदार साहित्य व विपुल वाचक यामुळेच वाचनालये समृद्ध होतात. वाचनालयांनी गुणवत्ताधारक साहित्य संपदा आपापल्या वाचनालयात ठेवून घरोघरी वाचनसेवा पोचविण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन ग्रंथमित्र भास्कर पवार यांनी केले.

आमदार डाॅ. वजाहत मिर्झा यांच्या स्थानिक विकास निधीतून करमाळा तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालयसह ४५ शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना ग्रंथभेट मिळाली.

या ग्रंथांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक विजयकुमार पवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे या वाचनालयानां ग्रंथभेट मिळाली.

या ग्रंथभेट वितरण कार्यक्रम प्रसंगी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रमोद बेरे , अण्णा मोरे, डाॅ. शेळके, शहाजी सरडे, मनोहर ढेरे,विश्वास पाटील, नामदेव भोगे, भरत सरडे, शिंदे सर व करमाळा तालुक्यातील ४५ वाचनालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अण्णा मोरे,करमाळा यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

हेही वाचा-साखर विकली मात्र सेवाकर आणि जिएसटी भरला नाही; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याची सगळी बँक खाती सील

करमाळा बस स्थानकावर पुण्यामुंबईहुन येणाऱ्या प्रवाशांची कोरोनाची टेस्ट करा

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर वाचन मंदिराचे व्यवस्थापक प्रदीप चौकटे यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here