करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुका ग्रामीण भागात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुका ग्रामीण भागात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा

केत्तूर (अभय माने) गणरायाच्या आगमनानंतर मध्यरात्री केत्तूरसह करमाळा तालुक्यातील पांडे, पोथरे, गोयेगाव, वाशिंबे, पारेवाडी, दिवेगव्हाण, पोमलवाडी, जिंती येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

जवळजवळ तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर हा पाऊस झाल्याने करमाळा तालुक्याच्या जीरायती भागातील शेतकऱ्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

गेले आठवडाभर ” सप्टेंबर हिट ” चा चटका जोरकसपणे जाणवत होता. त्यामुळे उकाडाही मोठ्या प्रमाणावर वाढला होता बुधवार (ता.31) रोजी सायंकाळी आभाळ भरून आले होते मोठ्या व दमदार पावसाची संकेत मिळत होते.

रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान पावसाचा शिडकावा झाला त्यानंतर मध्यरात्री सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले सखल भागातून पाणी वाहिले तर इतर ठिकाणी पाणी साचले होते.

पावसाळा संपत आला तरी, तालुक्यात जोरदार व दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. मागील काही वर्षापासूनचा इतिहास पाहता तालुक्यात गणपती काळात परतीचा पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. गणराया नेहमीप्रमाणे बरसात करेल अशी अपेक्षा व प्रार्थना आहे. दरम्यान गुरुवारी (ता.1) दिवसभर दमट वातावरण होते.वातावरणात उष्णता वाढली होते त्यामुळे पुन्हा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता होती परंतु पावसाने मात्र गुंगाराच दिला.

मध्यंतरी अधून मधून रिमझिम पाऊस झाल्याने गुरांचा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.तालुक्यातील पाझर तलाव भरण्यासाठी मोठ्या व दमदार पावसाची गरज आहे.

litsbros

Comment here