करमाळाशैक्षणिक

..तरच शाळा नियमित सुरू कराव्या; वाचा करमाळा उपसभापती सरडे शाळा सुरू करण्याबाबत काय म्हणाले.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

..तरच शाळा नियमित सुरू कराव्या; वाचा करमाळा उपसभापती दत्तात्रय सरडे शाळा सुरू करण्याबाबत काय म्हणाले.?

करमाळा प्रतिनिधी(सुनिल भोसले) ; कोरोना रोगाने देशात शिरकाव केल्यापासून शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला असला तरी सुरक्षितता महत्त्वाची होती. म्हणून महाराष्ट्र सरकारने शाळा बंद केलेल्या होत्या, परंतु आता शाळा सुरू करण्यासाठी पालकांनकडुन जोर वाढु लागला आहे. म्हणून शासन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.  तरी बहुतांश भागात सुरू झालेल्या शाळेत पालक आणि विद्यार्थी यांचा अल्प प्रतिसाद पहायला मिळत आहे.

याला कारण असे की शाळांकडून पालकांकडे मागण्यात येणारे संमतीपत्र. जरी पालक म्हणून आम्ही संमतीपत्र द्यायला तयार असू तर शालेय प्रशासनाकडून देखील विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेऊन कोणकोणत्या उपाययोजना आणि काळजी घेण्यात येणार आहे.? याची माहिती देखील पालकांना उपलब्ध व्हावी, अशी मागणी तालुका पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी चिखलठाण‌ येथील रयत शिक्षण संस्थेचे रामबाई बाबुलाल सुराणा उच्च माध्यमिक विद्यालय येथे बोलताना पालक म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पुढे बोलताना त्यांनी प्रशालेत आपत्कालीन व्यवस्था म्हणून तातडीची वैद्यकीय सेवा तथा वैद्यकीय लोकांचा ताफा उपलब्ध असावा. तसेच क्वारंटाईन करण्यासाठी किंवा तपासणी तथा विलगीकरण करण्यासाठी एक स्वतंत्र खोली उपलब्ध असावी.

संपूर्ण विद्यार्थी हित लक्षात घेत एकूणच संपूर्ण सुरक्षितपणाची हमी मिळत असेल तरच शाळा नियमित सुरू कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.तसेच अॅानलाईन शिक्षण प्रक्रिया अधिक सक्रिय आणि गतिमान करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माने सर, मासाळ सर, जाधव सर, गोडगे सर तसेच पालकामधून अजिनाथ मोरे., संतोष चव्हाण आदी उपस्थितीत होते.

litsbros

Comment here