करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
नेरले येथील जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम वाढदिवशी पुस्तक भेट उपक्रम
करमाळा(प्रतिनिधी); जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरले येथे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या वाढदिवशी शाळेस एक पुस्तक भेट म्हणून देण्याचा उपक्रम जून 2022 पासून चालू करण्यात आला आहे.
या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून शाळेत आज अखेर सुमारे शंभर पुस्तके भेट म्हणून जमा झाली आहेत. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,मनेरी सर,कसबे सर, जाधव सर, मोरे सर, आडेकर मॅडम व श्री.ओहोळ सर यांनी प्रयत्न केले आहेत.
यामध्ये गोष्टींची, माहितीची, व्याकरणाची, अभ्यासाची पुस्तके जमा झाली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत एक मोठे वाचनालय उभा करण्याचा मानस आहे.वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
Comment here