करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

केतूर; दसरा साध्या पध्दतीने साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर; दसरा साध्या पध्दतीने साजरा

केतूर (अभय माने); विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रशासनाने दिलेले नियम,अटी व निर्बंधाचे काटेकोर पालन करीत केतूर (ता.करमाळा) येथील देवीच्या मंदिरात अत्यंत साधेपणाने धार्मिक विधी करण्यात आले.

यादिवशी सार्वजनिक स्वरूपात होणारी देवीची छबिना मिरवणूक न काढता मंदिर प्रदक्षिणा घालून पारंपारिक पद्धतीने देवीची पूजा करण्यात आली देवीच्या मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील व त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी मोरे पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे कोणताही गाजावाजा किंवा डामडोल,फटाक्याची आतषबाजी न करता अतिशय साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. नवरात्रीमध्ये सकाळी व संध्याकाळी केवळ देवीच्या आरती व्यतिरिक्त इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

हेही वाचा – ब्रेकिंग न्यूज; अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्यसरकारने जाहीर केले 10 हजार कोटींचे पॅकेज; शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत

“जेऊर मधून गेले पण नुकसानग्रस्तांना नाही भेटले..” माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेऊर पूरग्रस्तांकडे केले दुर्लक्ष; ‘यांनी’ केली खंत व्यक्त

ग्रामस्थांनी यावेळी सोशल डिन्टन्सचे पालन करीत भाविकांनी देवीचे दर्शन घेतले व एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसरा उत्सव साजरा केला.
यावर्षी प्रतिवर्षाप्रमाणे सोशल मीडियावर मात्र दसरा विजयादशमी सणाच्या शुभेच्छांनी मोबाईल अक्षरशः फुल्ल झाले होते.

litsbros

Comment here