करमाळामाणुसकी

गरीब, वंचित आदिवासी बांधवांसाठी ‘जुने कपडे संकलन’ शिबिराचे आयोजन; समाजबंधचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गरीब, वंचित आदिवासी बांधवांसाठी ‘जुने कपडे संकलन’ शिबिराचे आयोजन; समाजबंधचे आवाहन

केतूर (अभय माने) दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनादिवशी समाजबंध संस्थेने पुण्यामध्ये ‘जुने कपडे संकलन’ शिबीराचे आयोजन केले आहे. 26 जानेवारी या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे संकलन असेल. यानिमित्ताने कपडे संकलन केंद्रावर आपल्याकडील जुने कपडे द्यावेत असे आवाहन पुणे प्रकल्प समन्वयक स्वाती महानंदा सुरेश यांन केले आहे.

समाजबंध संस्था ही मागील सहा वर्षांपासून महिला आरोग्य व मासिक पाळी या विषयांवर ग्रामीण व आदिवासी भागात काम करते. समाजबंध संचलित हेमडी (ता.पेण, जि. रायगड) येथे कातकरी आदिवासी महिलांमार्फत चालवल्या जाणाऱ्या ‘अंत्योदय’ प्रकल्पात व पुण्यातील ‘सावित्री फातिमा मंच’ प्रकल्पात जुन्या कपड्यांपासून मासिक पाळीच्या काळात वापरावयाचे कापडी आशा पॅड बनवले जातात.

हे बनवलेले कापडी पॅड आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांना वापरण्यासाठी विनामूल्य दिले जातात. आजवर हजारो महिलांना याचा लाभ झाला आहे. यासोबतच महिलांचे प्रबोधन सत्र ही याआधी संस्थेचे कार्यकर्ते घेत असतात.

या कामांसाठीच नागरिकांनी दिलेले जुने कपडे उपयुक्त ठरणार आहेत. ‘आपल्याकडील धुतलेले, स्वच्छ, वापरण्यायोग्य कपडे, सुती कपडे, साड्या, बेडशीट समाजबंधच्या संकलन केंद्रावर आणून द्यावेत. अशी माहिती पुणे प्रकल्प समन्वयक प्रथमेश राजश्री तानाजी यांनी दिली आहे.

पत्ता: राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी शाळा, सारसबागच्या मागे, सिंहगड रोड, दांडेकर पूल जवळ, पुणे
दिनांक : 26 जानेवारी 2023.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9607360466, 9022263428

litsbros

Comment here