करमाळासोलापूर जिल्हा

उजनी जलाशयातून आपला विद्युत पंप काढताना विजेचा शॉक लागून केतूरचा तरुण शेतकरी जखमी; दवाखान्यात उपचार सुरू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी जलाशयातून आपला विद्युत पंप काढताना विजेचा शॉक लागून केतूरचा शेतकरी तरुण जखमी; दवाखान्यात उपचार सुरू

केतुर (अभय माने) उजनी जलाशयातून आपला विद्युतपंप, केबल बाजूला घेत असताना विजेचा शॉक बसून केतुर (ता. करमाळा) येथील शेतकरी राजेंद्र रामचंद्र खटके (वय 36) जखमी झाले आहेत.

उजनी जलाशयाचा पाणीसाठा पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने पाणलोट परिसरातील शेतकरी आपले विद्युत पंप केबल पाईप पाण्यापासून बाजूला घेत आहेत.

राजेंद्र खटके हे सकाळी सातच्या दरम्यान आपला विद्युतपंप बाजूला घेण्यासाठी जलाशयाजवळ गेले असता विद्युतपंप, केबल बाजूला घेत असताना त्यांना विजेचा जबर झटका बसला व ते बाजूला फेकले गेले.

जवळील हे जवळील मच्छीमार महिला शालन राजाराम पतुले यांनी पाहिले व इतर शेतकऱ्यांनी या घटनेची कल्पना दिली त्यांना केतुर येथील खाजगी दवाखान्यात नेले व प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी बारामती येथे त्यांना हलविण्यात आले.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजत आहे.

litsbros

Comment here