करमाळाकेमक्राइम

‘तू मला भेटायला ये, नाहीतर तुझे फोटो फेसबुकवर टाकेन’ अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग; केम येथील एका विरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘तू मला भेटायला ये, नाहीतर तुझे फोटो फेसबुकवर टाकेन’ अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग; केम येथील एका विरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा

केम (प्रतिनिधी); केम-ढवळस या जुन्या रस्यावर भेटायला ये, नाहितर तुझे फोटो फेसबुकवर टाकेल, अशी धमकी देऊन विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी केम येथे घडली आहे. सदर प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी सागर संजय तळेकर यांच्या विरोधात करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. यात विवाहित महिलेने करमाळा पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. त्यात असे म्हटले आहे कि, मी हॅस्पिटल मध्ये अॅडमिट असताना गावातील सागर तळेकर तिथे आला आणी माझे फोटो काढून गेला. त्या नंतर काहि दिवसानी सागर तळेकर यानी फोन केला, तू मला भेटायला ये नाहितर तुझे फोटो फेसबुकवर टाकेन अशी धमकी त्याने मला दिली.

त्या भितीने मी ढवळस केम रस्त्यावर भेटायला गेले असता त्याने तु भेटायला येत जा नाहितर मी तुझे फोटो फेसबुकवर टाकेन असे म्हणून माझा विनयभंग केला.

या नंतर हि हकिकत सदर महिलेने तिच्या पतीला सांगितली. या प्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस प्रविण सहाने करीत आहे.

litsbros

Comment here