करमाळाजेऊरशैक्षणिक

जेऊर येथील जीनियस अबॅकस सेंटरच्या वतीने होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; सौ.ज्योतीताई नारायण पाटील राहणार उपस्थित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथील जीनियस अबॅकस सेंटरच्या वतीने होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; सौ.ज्योतीताई नारायण पाटील राहणार उपस्थित

करमाळा (प्रतिनिधी); जिनियस अबॅकस सेंटर जेऊर संचलित प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर नॅशनल स्पर्धा मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिनांक 21 सप्टेंबर 2021 मंगळवारी सकाळी दहा वाजता जेऊर येथील ग्रामपंचायत हॉल भारत हायस्कुल समोर या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती जीनियस अबॅकस क्लासेस च्या संचालिका कुमारी अंकिता विष्णू वेदपाठक( एम ए डीटीएड) यांनी माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देताना कुमारी अंकिता वेदपाठक पुढे बोलताना म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या अंतर्गत सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच आजचे विद्यार्थ्यांचे भविष्यात त्यांचे नाव लौकिक होवो हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला असल्याची माहिती वेदपाठक यांनी दिली.

हेही वाचा- अशी सांगायचा मनोहर भोसले भक्तांना त्यांची खासगी माहिती अचूक; ती ऐकूण भक्त व्हायचे चकित; वाचा सविस्तर

शिवसेनेचे आ.सावंत यांच्या करमाळा तालुक्यातील भैरवनाथ शुगर्स विरोधात ‘या’ मागण्यांसाठी होणार आंदोलन; मुख्यमंत्र्यांना निवेदन

सदरच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे, तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ ज्योतीताई नारायण पाटील, तसेच बालरोग तज्ञ डॉक्टर सौ वर्षा करंजकर याशिवाय फार्मासिस्ट सौ राजकुवर पाटील भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ माया झोळ हे मान्यवर सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

सदर गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला जेऊर शहरातील पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे कळकळीचे आवाहन जीनियस अबॅकस क्लासेस च्या संचालिका कुमारी अंकिता वेदपाठक यांनी केले आहे.

litsbros

Comment here