उपजिल्हा रुग्णालयात उडाला होता गोंधळ, युवा नेते शंभूराजे जगताप यांनी समन्वय साधून सुरळीत सुरू केले लसीकरण
करमाळा (प्रतिनिधी): तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी अडचण येत आहे, असा फोन ज्यावेळी शंभूराजेंना आला त्यावेळी शंभुराजे स्वतः रुग्णालयात गेले व त्यांनी डॉक्टरांशी बोलून त्या रूग्णाची व्यवस्था करून दिली. रुग्णालयात शंभूराजेंनी लोकांची प्रचंड गर्दी ,गोंधळ चालु आहे, हे पाहिले चौकशी केली असता, covid-19 च्या लस घेण्यासाठी आलेले लोक आहेत, असे निदर्शनास आले.
सकाळी सात वाजल्यापासून लोक लस घेण्यासाठी रांगेत उभा होते, त्यामुळे लोक संतापले होते. पोलीस कर्मचार्यांना लोकांची गर्दी आवरत नव्हती. त्याचबरोबर लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे व्हेरीफिकेशन/ ओळखपत्र तपासण्यासाठी सर्वर डाऊन असल्याकारणाने विलंब होत होता.
शंभूराजेंनी व त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी सर्व लोकांना त्यांना सहकार्य करण्यास सांगितले. त्या ठिकाणी शंभुराजेंनी ज्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास आहे व जे सत्तर वर्षाच्या पुढील नागरिक आहेत, त्यांची तातडीने अधिकारी वर्गाला सांगून वेगळी व्यवस्था केली.
इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने ओपरेटरवर लोकांच्या गर्दीचा दबाव आला होता. शंभूराजें बरोबर असलेले दोन सहकारी संजीतकुमार सिंधी व विश्वजीतराव जगदाळे यांनी ऑपरेटरला त्यांच्या कामात सहकार्य केले. 200 लोकांच्या लस पूर्ण होईपर्यंत, शंभूराजे रुग्णालयात तब्बल पाच तास उपस्थित होते. सर्व कर्मचारी व अधिकारी यांनीही चांगली सेवा दिली.
वेळेपेक्षा जास्त ड्युटी केली. यामुळे उपस्थित सर्व नागरिकांनी शंभूराजेंचे व त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. शंभूराजेंनी उपस्थित नागरिकांना माजी आपल्याला कधीही गरज असल्यास, माझ्याशी संपर्क साधावा मी आपल्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असेन असे सांगितले.
Comment here