करमाळाकरमाळा कोरोना अपडेट

आज शनिवारी ग्रामिणमध्ये एकही नाही तर करमाळा शहरात एकूण 22 नवे कोरोना रुग्ण; वाचा कोणत्या भागातील आहेत नवे रुग्ण.?

करमाळा शहर व तालुक्यात आज शनिवारी एकूण 22 नवे कोरोना रुग्ण; वाचा कोणत्या गावातील आहेत नवे रुग्ण.?

करमाळा माढा न्यूज; काल शुक्रवारी करमाळा शहर व तालुक्यात एकूण 27 रुग्ण सापडल्याने सर्वानाच धक्का बसला होता. आज ग्रामीण भागाला दिलासा मिळाला असून करमाळा शहरातच नवे 22 रुग्ण सापडल्याने चांगलाच हादरा बसला आहे. आज एकूण 92 टेस्ट करण्यात आल्या, त्यात हे रुग्ण सापडले. त्यात 13 पुरुष व 9 महिलांचा समावेश आहे. करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.

आजचे रुग्ण या भागातील-

बागवान नगर – 9 (6 पुरुष, 3 महिला)

मौलाली माळ – 2 (पुरुष)

सुतार गल्ली – 3 (2पुरुष, 1 महिला)

कानाड गल्ली – 2 (2 ही महिला)

karmalamadhanews24.com

भीमनगर – 1 (महिला)

सुमंत नगर – 4 (2 पुरुष , 2 महिला)

श्रावण नगर – 1 (पुरुष)

एकूण – 13 पुरुष 9 महिला

कोरोनामुळे आजवर करमाळा तालुक्यातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज शनिवारी 15 जणांना घरी सोडण्यात आले आहे. घरी सोडलेल्यांची एकूण संख्या 59 झाली आहे. तर तालुक्यातील आजवरची एकूण रुग्णसंख्या 150 झाली आहे.

तरी सर्वांनी काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा. कोणत्याही समारंभ, उत्सवासाठी इतर ठिकाणी जाऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा- बापरे! वडील गाळे विकणारच होते.. मग मुलगा बनला कर्दनकाळ; माढा तालुका हादरला; आठवड्यातील दुसरी घटना

जिल्ह्यात ३१ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू;वाचा सविस्तर जिल्हाधिकारी यांची सुधारित नियमावली

litsbros

Comment here